नांदेड जिल्ह्यातील सात विद्यार्थ्यी युक्रेनमध्ये अडकले
नांदेड : रशिया आणि युक्रेन या देशात युद्ध (War between Russia and Ukraine) सुरू झाले असून या परिस्थितीत युक्रेनमध्ये अडकलेल्या नांदेड जिल्ह्यातील नागरिकांची माहिती घेतली जात आहे. आतापर्यंत साहा मुले आणि एक मुलगी असल्याची माहिती समोर आली आहे. हे सर्व सहा सातही जण सुरक्षित असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. (Seven students from Nanded district stranded in Ukraine)
युक्रेनमध्ये असलेल्या नागरीक आणि मुलांच्या नातेवाइकांनी जवळच्या तहसील कार्यालयात संपर्क करून अडकलेल्या नागरिकांबाबत माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. (Seven students from Nanded district stranded in Ukraine)
युद्धाच्या परिस्थितीत नागरिकांना सुखरूप परत मायदेशी आणण्यासाठी देशपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. सात मुले असल्याची माहिती पालकांनी प्रशासनाशी संपर्क साधून दिली आहे. ही सर्व सातही विद्यार्थी वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी युक्रेनमध्ये आहेत. ते सध्या सुरक्षित असल्याचेही त्यांनी आपल्या पालकांना कळवले आहे. (Seven students from Nanded district stranded in Ukraine)