धक्कादायक : ” MPSC मायाजाल आहे, यात पडू नका…” असे लिहून विद्यार्थ्याने केली आत्महत्या
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) परिक्षा क्रॅक करूनही नोकरी न मिळाल्याने विद्यार्थ्याने गळफास केली आत्महत्या केली आहे. स्वप्नील सुनील लोणकर (वय 24, रा.गंगानगर, फुरसुंगी) असे आत्महत्या करणार्या विद्यार्थ्याचे नाव आहे. स्वप्नीलने आत्महत्येपुर्वी लिहलेल्या सुसायड नोट मध्ये एमपीएमसी हे मायाजाल आहे, यात पडू नका, असे लिहले आहे. The student committed suicide by writing, “MPSC is magic, don’t fall into it …”
स्वप्नीलचे वडील सुनील लोणकर यांचा शनिवार पेठेत बिल बुक बनविण्याचा छोटा प्रिटींग प्रेसचा व्यवसाय आहे. ते व त्यांच्या पत्नी असे दोघेजण संबंधीत व्यावसाय पाहतात. तर स्वप्नीने स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली होती. स्वप्नीलचे आई-वडील नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी कामानिमित्त बाहेर पडले. त्यानंतर त्यांची मुलगी दुपारी साडे चार वाजता घरी आली. तेव्हा, स्वप्नीलने त्याच्या खोलीमध्ये गळफास घेतल्याचे तिच्या निदर्शनास आले. या प्रकाराबाबत तिने आई-वडीलांना खबर दिली. त्यानंतर त्यास रुग्णालयात हलविल्यानंतर डॉक्टरांनी त्यास मृत घोषीत केले. The student committed suicide by writing, “MPSC is magic, don’t fall into it …”
स्वप्नील शिक्षण पुर्ण झाल्यापासून एमपीएससी’च्या परिक्षेची तयारी करीत होता. तो एमपीएससी’च्या 2019 च्या पुर्व व मुख्य परिक्षेत उत्तीर्ण झाला. मात्र त्याची मुलाखत दिड वर्षांपासून झालेली नव्हती. त्याचबरोबर त्याने 2020 मध्येही एमपीएससीची परिक्षा दिली. त्यामध्ये पुर्व परिक्षा तो उत्तीर्ण झाला, कोरोनामुळे मुख्य परिक्षा झाली नाही. या सगळ्या तणावातूनच त्याने आत्महत्या केल्याचे मृत्युपुर्वी चिठ्ठीत लिहून ठेवले आहे. The student committed suicide by writing, “MPSC is magic, don’t fall into it …”
अजून 72 जणांचे जीव वाचवायचे राहिले…
स्वप्नीलने दहावी परिक्षेत त्याने ९१ टक्के गुण मिळवले होते. कर्क रोग, डेंगी अथवा विषाणुजन्य तापाच्या रुग्णाच्या रक्तातील प्लेटलेट अचानक कमी होतात. त्यासाठी सुरु असलेल्या जनजागृतीमध्ये स्वप्नील सहभागी होत होता. त्याने महाविद्यालयामध्ये असताना अडीच वर्षात तब्बल २८ वेळा प्लेटलेट दान केले. त्याला १०० जीव वाचवायचे होते. पण आतापर्यंत त्याने २८ वेळा प्लेटलेट दान केले आहेत. आपल्या सुसाईड नोटमध्ये त्याने अजून ७२ जीव वाचवायचे राहिले अशी खंतही व्यक्त केली आहे. The student committed suicide by writing, “MPSC is magic, don’t fall into it …”