काय म्हणता…! थेट ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या विरोधात आंदोलनचा इशारा
पुणे : महागाई आणि इंधन दरवाढ करुन केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार सामान्यांची आर्थिक पिळवणूक करत आहे. (The Modi government at the Center is exploiting the common man by increasing inflation and fuel prices.) तरीही ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे याविषयी चकार शब्द काढायला तयार नाहीत. देशातील परिस्थितीवर अण्णांनी बाळगलेलं मौन तोडून, भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा राळेगण सिद्धी येथे आण्णांच्या विरोधात बेमुदत धरणे आंदोलन करू (Warning of indefinite agitation against Anna at Ralegan Siddhi) असा इशारा देश बचाओ जनआंदोलन समिती, शिवप्रेमी जनजागरण समितीसह (Desh Bachao Janandolan Samiti, Shivpremi Janajagaran Samiti) अन्य काही संघटनांनी दिला आहे. (Activists warned against agitating against senior social activist Anna Hazare)
शिवप्रेमी जनजागरण समितीचे मुकुंद काकडे म्हणाले, आम्ही गेली २५ वर्षे आंदोलनामध्ये आहोत. आण्णा हजारेंच्या आंदोलनातही सक्रीय होतो. परंतु सध्या देशात इंधन दरवाढीमुळे प्रचंड महागाई वाढली आहे. जाचक कृषी कायदे लादले जात आहेत. प्रचंड बेरोजगारी वाढत आहे. नागरिक हैराण झाले, असे असताना आण्णा हजारे यांनी मौन का बाळगले, हे आम्हाला समजत नाही. त्यांनी मौन तोडून भुमिका स्पष्ट करावी. पुन्हा नव्याने केंद्र सरकारविरोधात आंदोलन करावे, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. (Activists warned against agitating against senior social activist Anna Hazare)
सध्या देशात विविध मुद्द्यांवर आंदोलनाची गरज असताना आण्णांनी मौन तोडावे. त्यांची भुमिका स्पष्ट करावी , ही आम्हां कार्यकर्त्यांची मागणी आहे. अन्यथा आम्ही त्यांच्याविरोधात त्यांच्याच राळेगण सिद्धीमध्ये बेमुदत धरणे आंदोलन करू, असा इशारा दिला आहे. (Activists warned against agitating against senior social activist Anna Hazare)
नोटबंदीमुळे झालेली आर्थिक हानी, कोरोनामुळे लावण्यात आलेला देशव्यापी लॉकडाऊन, वाढती महागाई आणि भीषण बेरोजगारीमुळे जनता भरडली जात आहे. देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे. उद्योग धंदे बंद पडत आहेत. लाखो कामगार बेरोजगार होत आहेत. वित्तीय तूट भरून काढण्याठी केंद्र सरकारकडून जनतेची लूट सुरू आहे. देशात इतका अनर्थ सुरु असताना ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे गप्प बसले आहेत, याचे अश्चर्य वाटत असल्याचे कार्यकर्ते सांगत आहेत.(Activists warned against agitating against senior social activist Anna Hazare)