(Strict restrictions apply in Nanded district) नांदेड जिल्ह्यात कडक निर्बंध लागू

नांदेड : शहरासह जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आता निर्बंध कडक केले आहे. त्यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर (Dr. Vipin, IAS, Collector, Nanded) यांनी आदेश जारी केले आहेत. (Strict restrictions apply in Nanded district)

जिल्ह्यातील सर्व खाजगी कोचिंग क्लासेस व आठवडी बाजार १२ मार्च ते २१ मार्चदरम्यान बंद ठेवले जाणार आहेत. तर सर्व दुकाने सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेदरम्यान सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली असून, त्यात नियमांचे पालन करावे लागणार आहे. खाद्यगृह, परमिट रूम, बार सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत त्यांनाही ५० टक्के क्षमतेत सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. (Strict restrictions apply in Nanded district)

जिल्ह्यात १५ मार्चपर्यंत पूर्व नियोजित कार्यक्रमासाठी तहसीलदारांची परवानगी आवश्यक करण्यात आली. १६ मार्च ते २१ मार्चपर्यंत मंगल कार्यालय, हॉल्स याठिकाणी लग्नसमारंभ व इतर सार्वजनिक कार्यक्रमांना पूर्णपणे बंदी घालण्यात आली. भाजीमंडई ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवता येणार असून, जीम, खेळाची मैदाने हे सुरू राहतील, मात्र कोणत्याही स्पर्धा घेता येणार नाही. (Strict restrictions apply in Nanded district)

यापूर्वीच घोषीत झालेल्या सर्व परीक्षा कोरोना नियमावलीचे पालन करून घेण्यासाठी परवानगी देण्यात आली. तर कोरोनचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क, फिजिकल डिस्टनसिग, सॅनिटायझर चा वापर बंधनकारक केला आहे. हे आदेश १२ मार्चच्या मध्यरात्रीपासून २१ मार्चच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहतील, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी स्पष्ट केले. (Strict restrictions apply in Nanded district)

Local ad 1