Pune Metro । पुणे मेट्रोचा अजब कारभार ; तिकाटापेक्षा पार्किंग शुल्क दुप्पट

Pune Metro । पुणे : पुणे मेट्रोच्या पुणे जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानकावर सशुल्क वाहनतळ सुविधा सोमवारपासून (ता.३०) सुरू करण्यात आली होती. मात्र,  या ठेकेदाराने वाहनचालकांकडून दुप्पट वसुली सुरू केल्याने मेट्रोच्या तिकीट पेक्षा वाहनतळ महाग असल्याची तक्रार प्रवाशांनी सुरू केली. यामुळे अखेर महामेट्रोला पहिल्याच दिवशी या ठेकेदाराचे कंत्राट रद्द करण्याची नामुष्की ओढावली आहे. (Strange management of Pune Metro; The parking fee is twice as much as the ticket)

 

पुणे मेट्रोच्या पिंपरी-चिंचवड महापालिका, संत तुकारामनगर, फुगेवाडी, बोपोडी, शिवाजीनगर, जिल्हा न्यायालय स्थानके, आयडियल कॉलनी आणि मंगळवार पेठ स्थानकावर वाहनतळाची सुविधा आहे. मेट्रोकडून या ठिकाणी सशुल्क वाहनतळाची सुविधा सुरू केली जात आहे. या ठिकाणी दुचाकीसाठी एका तासाला ८ रुपये आणि दोन तासाला १२ असे शुल्क आकारण्यात येते. याचबरोबर हेल्मेट ठेवण्यासाठी ५ रुपये शुल्क आकारण्यात येते. याचे कंत्राट देण्यात आले आहे.

 

जिल्हा न्यायालय स्थानकातील वाहनतळ सुविधा सोमवारपासून सुरू झाली. ठेकेदाराने वाहनचालकांकडून दुप्पट शुल्क वसुली सुरू केली. त्याने दुचाकीसाठी तासाला १५ रुपये शुल्क आणि मोटारीसाठी तासाला ३५ रुपये शुल्क आकारण्यास सुरूवात केली. याबाबतची तक्रार अनेक मेट्रो प्रवाशांनी केली. मेट्रोचा तिकिटाचा किमान दर १० रुपये आहे. यावेळी वाहनतळ शुल्काचा दर त्यापेक्षा जास्त असल्याचा मुद्दाही प्रवाशांनी उपस्थित केला. वाहनतळ शुल्कावरून आरडाओरडा झाल्यानंतर महामेट्रो ने संबंधित ठेकेदाराचे कंत्राट रद्द केले आहे.

 

 

मेट्रोच्या शिवाजीनगर आणि जिल्हा न्यायालय स्थानकात सशुल्क वाहनतळ सुविधा सोमवारपासून सुरू झाली. तेथील ठेकेदार निश्चित शुल्कापेक्षा जास्त वसुली करीत असल्याची बाब निदर्शनास आली. त्यामुळे आम्ही त्याची वाहनतळ शुल्क वसुली थांबवून त्याचे कंत्राट रद्द केले. – हेमंत सोनावणे, कार्यकारी संचालक, महामेट्रो

 

ठेकेदाराची पहिल्याच दिवशी हिम्मत कशी झाली..

सशुल्क वाहनतळामध्ये अनेक ठिकाणी ज्यादा पैसे घेतल्याच्या तक्रारी असतात. परंतु कामाच्या पहिल्याच दिवशी दुप्पट रक्कम वसूल करण्याची हिंमत्त कंत्राटदारा होऊच कशी शकते, असा प्रश्न उपस्थित होत आहे.  त्यामुळे हा कंत्राटदार एखाद्या राजकीय नेत्या जवळचा किंवा मेट्रोतील अधिकाऱ्याचा नातेवाईक असू शकतो, अशी चर्चा सुरु झाली आहे.

 

Local ad 1