...

बांगलादेशातील अल्पसंख्याकांवर होणारा अत्याचार  थांबवा ; पुण्यात मुस्लिम समाजातर्फे धरणे आंदोलन

पुणे. गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशामधील अल्पसंख्यांक असलेल्या हिंदु बांधवावर अत्याचार व अन्याय होत आहे. त्यांना संरक्षण देवून या संदर्भात आंतरराष्ट्रीय कृती समिती स्थापन करण्यात, यावी अशी मागणीसाठी पुणे अमन कमिटीच्या (Pune Aman Committee) वतीने कलेक्टर ऑफिस जवळ धरणे आंदोलन करण्यात आले. (Stop the atrocities against minorities Bangladesh)

 

 

भारत देश सांस्कृतिक, शैक्षणिक, शांतताप्रिय व लोकतांत्रिक देश म्हणून जगभर ओळखला जातो. या संस्कृती जपणाऱ्या देशामध्ये जातीय द्वेष पसरवण्याच्या घटना वाढत असून, नागरिकांमध्ये चिंतेचे व भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदरील घटनेमुळे देशातील संस्कृतीला गालबोट लागत आहे. अशा घटनांवर आळा घालावे, अशी ही मागणी यावेळी करण्यात आली.

कार्यक्रमाचे आयोजन जावेद खान, अँड अय्युब शेख, जाहिदभाई शेख, बापू कांबळे, अहमद सय्यद, डॅनियल लांडगे, सादिक लूकडे, नुरुद्दिन सोमजी, सिराज बागवान, कणव चव्हाण, मुफ्ती शाहिद, खीसाल जाफरी यांनी केले. या कार्यक्रमात मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्ये सहभागी झाले होते.

Local ad 1