मोठी बातमी : मदतीच्या रक्कमेतून शेतकर्यांची कर्ज वसुली थांबवा ; बँकाना सहकार विभागाचा दणका
पुणे ः राज्यात गारपीट व अवेळी झालेल्या पावसामुळे शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. (Hailstorm and unseasonal rains have damaged crops in the state) या नुसकानग्रस्त शेतकर्यांना (To the affected farmers) दिल्या जाणार्या मदतीतून बँका थकीत कर्ज वसूल करत होते. त्यामुळे शेतकर्यांत नाराजी व्यक्त केली जात होती. त्यावर राज्याच्या सहकार विभागाने मदतीच्या रक्कमेतून कोणत्याही प्रकारची थकबाकी वसूल करू नका, असे बजावले आहे. (Stop recovering farmers’ debts from the aid money)
राज्यात मार्च, एप्रिल व मे.2021 या कालावधीत गारपीट व अवेळी पावसामुळे शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्याने मंत्रिमंडळ उपसमितीच्या 12 मे 2021 रोजी झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार बाधित शेतकर्यांना मदत देण्यासाठी निधी वितरित करण्यात आला आहे. शेतीपिके व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठीची मदतीची रक्कम खातेदारांच्या बँक खात्यावर थेट जमा करताना मदतीच्या रक्कमेमधून कोणत्याही बँकेने कोणत्याही प्रकारची वसुली करू नये. याकरिता सहकार विभागाने आवश्यक ते आदेश निर्गमित करण्याचे निर्देश दिले आहेत.सदर निर्देशाच्या अनुषंगाने विभागामार्फत आदेश देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. (Stop recovering farmers’ debts from the aid money)
माहे मार्च, एप्रिल व मे, 2021 या कालावधीत गारपीट व अवेळी पावसामुळे शेतीपिकांचे व बहुवार्षिक पिकांचे नुकसान झाल्याने निधीचे वाटप करताना विविध दक्षता घेण्याचे निर्देश दिले आहेत. या परिपत्रकान्वये सूचित करण्यात येते की, गारपीट व अवेळी पावसामुळे शेतीपिके व बहुवार्षिक पिकाच्या नुकसानीसाठी वाटप केलेली मदतीची रक्कम खातेदारांच्या बँक खात्यावर जमा करताना मदतीच्या रक्कमेमधून कोणत्याही बँकेने कोणत्याही प्रकारची वसुली करू नये, असे ठणकावले आहे. (Stop recovering farmers’ debts from the aid money)