...

जिल्ह्यातील हातभट्टी दारू बंद करा : हातभट्टी दारू राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या रडारवर

पुणे : जिल्ह्यात ग्रामीण भागासह शहरालगत असलेल्या परिसरात हातभट्टी दारू तयार करून विकली जाते. यासंदर्भात थेट राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई (State Excise Minister Shambhuraj Desai) यांनी दखल घेतली आहे. जिल्ह्यातील अवैध हातभट्टीच्या माध्यातून होणारी मद्यविक्री संपूर्णपणे बंद करण्यासाठी मोहिम राबवावी, असे असे आदे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई (State Excise Minister Shambhuraj Desai) यांनी दिले आहेत. (Stop hand furnace liquor in Pune district)

 

 

शासकीय विश्रामगृह येथे आयोजित राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पुणे जिल्हा आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला राज्य उत्पादन शुल्क विभागीय उपायुक्त अनिल चासकर, अधीक्षक चरणसिंह राजपूत, उपअधीक्षक संजय पाटील, युवराज शिंदे आदी उपस्थित होते. (Stop hand furnace liquor in Pune district)

 

 

 

देसाई म्हणाले, जिल्ह्यातील अवैध हातभट्टीच्या माध्यातून होणारी मद्यविक्री बंद करुन संबंधितावर तात्काळ गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही करा. कार्यवाही करतांना पोलीस विभागाची मदत घेण्यात यावी. परराज्यातून होणारी अवैध मद्यवाहतूक रोखण्याबाबत कार्यवाही करावी, अशा सूचना त्यांनी केल्या. पोलीस विभागाप्रमाणे अवैध दारू व्यवसायाला प्रतिबंध घालण्यासाठी खबऱ्यांची मदत घेण्याबाबत विचार करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. (Stop hand furnace liquor in Pune district)

Local ad 1