नांदेड : दगडफेकीची घटना दुःखद ; दोषींवर कठोर कारवाई करा ; निर्दोषांना वेठीस धरू नका : फारुख अहमद

नांदेड : त्रिपुरा दंगली निषेधार्थ आंदोलनात शुक्रवारी (दि.12 नोव्हेंबर) दुपारी नांदेड शहरात काही ठिकाणी झालेली दगडफेक दुःखद व निषेधार्ह आहे. या दगडफेकीत प्रत्यक्ष सहभागी असणाऱ्या आरोपींवर कडक कारवाई करण्यात यावी, मात्र जे निर्दोष आहेत त्यांचेवर कोंबिन्गच्या (Combing operation) नावाखाली खोटे गुन्हे दाखल करण्यात येऊ नयेत, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते फारुक अहमद (Vanchit Bahujan Alliance state spokesperson Farooq Ahmed) यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे (District Superintendent of Police Pramod Shewale) यांच्याकडे केली आहे. (The stoning incident is tragic; Take stern action against the guilty)

 

 

त्रिपुरातील धार्मीक स्थळांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी शुक्रवारी नांदेड शहरात आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान काही अज्ञात लोकांनी बाफना रोड व शिवाजी नगर भागात दगडफेक केल्याचे समोर आले. दगडफेक ही निषेधार्य आहे. या प्रकरणातील खऱ्या आरोपींना त्या – त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरेच्या आधारावर ओळख पटवून कारवाई व्हावी, मात्र निर्दोष व्यक्तींचा या प्रकरणात समावेष नाही, अशा निर्दोष व्यक्तीवर कोम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली खोटे गुन्हे दाखल करण्यात येऊ नयेत. अशी मागणी जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांना वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते फारूक अहमद यांनी केली. (The stoning incident is tragic; Take stern action against the guilty)

 

*अफवांवर विश्वास ठेवू नये नांदेडची परिस्थिती पूर्ण नियंत्रणात : जिल्हा पोलीस अधिक्षक शेवाळे*

अफवांवर विश्वास ठेवू नये नांदेडची परिस्थिती पूर्ण नियंत्रणात : जिल्हा पोलीस अधिक्षक शेवाळे

 

नांदेड मधील मुस्लिम समुदाय हा शांतताप्रिय समाज असून तो संवैधानिक मार्गाने मज्जिदवर झालेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी शांततेत रस्त्यावर उतरला होता, मात्र काही अज्ञात समाजकंटकांनी शहरातील दोन – तीन भागात दगडफेक केल्याचे वृ्तआहे. यावरून काही विरोधक या संधीचा राजकीय फायदा उठवण्याचा तयारीत असून त्यांनी आंदोलकांवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे. मात्र जे खरे दोषी आहेत त्यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी व निर्दोष व्यक्तींवर खोटे गुन्हे दाखल करू नय,े अशी विनंती फारूक अहमद यांनी प्रमोद शेवाळे यांना केली आहे. (The stoning incident is tragic; Take stern action against the guilty)

 

 

नांदेड शहरातील सर्व समाजातील नागरिकांनी आपल्या शहराची कायदा सुव्यवस्था टिकवून शांततेचे सहकार्य करावे. कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले आहे. (The stoning incident is tragic; Take stern action against the guilty)

Local ad 1