पुणे. नवीन वर्षाच्या व नाताळ (New Year and Christmas) सणानिमित मोठ्या प्रमाणात मद्याचा वापर केला जातो. या संधीचा फायदा घेऊन बनानवट मद्य कमी दरात विकले जाते. मुळशी तालुक्यातील वारुंजी येथील एका सोसायटीमध्ये बनावट स्कॉच व्हिस्कीच्या 24 आणि विविध ब्रॅण्डच्या उच्च प्रतीच्या स्कॉचच्या ११० रिकाम्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. याठिकाणावरुन सुमारे ५ लाख ९६ हजार ५१० किमंतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. यातील आरोपीचे परराज्यातील मद्य तस्करांशी संबंध असण्याची शक्यता आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्कच्या जी विभागाने केली आहे. (Stock of Scotch whisky seized in Marunji)
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे (State Excise Department) उप-अधीक्षक सुजित पाटील (Deputy Superintendent Sujit Patil) यांना कमी प्रतीचे मद्य, उच्च प्रतीच्या रिकाम्या स्कॉचच्या बाटल्या मध्ये भरून बनावट स्कॉच व विदेशी मद्याची विक्री होते, अशी माहिती मिळाली होती. त्यानुसार पाटील यांच्या मार्गदर्शनात जी विभागाचे दुय्यम निरिक्षक अभय औटे यांच्या नेतृत्वाखाली पथक निर्माण केला होती. या पथकाने चिंचवडमधील हॉटेल ईगल गार्डन समोर सापळा लावला होता. यावेळी बनावट मद्याची वाहतूक करीत असताना धनजी जेठा पटेल (Dhanji Jetha Patel) याच्याकडून उच्च प्रतीच्या स्कॉच च्या रिकाम्या बाटल्यामध्ये कमी प्रतीचे विदेशी मद्य अशा एकूण २४ बाटल्या जप्त केल्या आहेत. तसेच तीनचाकी रिक्षाचालक बाबासाहेब शिवाजी धाकतोडे रिक्षा वाहन क्र. एमएच- १४-जेपी-०८८४ यामधून अवैध मद्याची वाहतूक करीत असताना अटक करण्यात आली.
अटक आरोपींकडे केलेल्या चौकशीतून मारूंजो गावावरून मद्याच्या बाटल्या आणल्याचे निष्पन्न झाले. मारूंजी गावचे हद्दीत, स्प्रिंग वुडस सोसायटी, फ्लॅट नं.२०१, स.नं.०२, ता. मुळशी, जि.पुणे या त्याच्या राहत्या घराची झडती घेतली. त्या ठिकाणावरुन ग्रॅण्डच्या उच्च प्रतीच्या स्कॉचच्या १ लि. क्षमतेच्या एकूण १८ सिलबंद बाटल्या तसेच विविध ब्रॅण्डच्या उच्च प्रतीच्या स्कॉचच्या ११० रिकाम्या बाटल्या, बुचे. लेबले मिळून आल्या आहेत. आरोपी विरूध्द महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पुढील तपास दुय्यम निरीक्षक अभय औटे (Sub Inspector Abhay Aute) हे करीत आहेत. निरीक्षक एस.यु.शिंदे (Inspector S.U.Shinde), बी.जी.रेडेकर, गणेश पठारे, अमृता पाटील, प्रमोद पालवे, विजय धंदुरे, संतोष गायकवाड, रसुल काद्री, प्रमोद खरसडे, यांनी भाग घेतला होता. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक चरणसिंग राजपुत, यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई करण्यात आली.
नवीन वर्षाच्या व नाताळ सणाच्या निमिताने मद्य प्राशन करणाऱ्या नागरीकांनी केवल स्वस्त दराने आणि घरपोच मद्य मिळत आहे म्हणून मद्य खरेदी न करता अधिकृत व परवानाधारक विक्रेत्याकडूनच मद्य खरेदी करावे. अन्यथा स्वस्त दरात उपलब्ध होणारे मद्य बनावट, भेसळीचे किंवा कमी दर्जाचे असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा भोसळयुक्त मद्यापासून सावध रहावे.
– चरणसिंग राजपुत, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क पुणे.