सौंदर्य प्रसाधनांच्या नावाआडून गोवा मद्याची बेकायदा वाहतूक !

राज्य उत्पादन शुल्क सासवड विभागाची धडक कारवाई

पुणे. गोवा राज्यात निर्मित व विक्रीस असलेले रॉयल ब्लु माल्ट व्हिस्कीच्या १८० मिली क्षमतेच्या ७९,६८० सिलबंद बाटल्या (१६६० बॉक्स), रॉयल ब्लु माल्ट व्हिस्कीच्या ७५० मिली क्षमतेच्या ६४८० सिलबंद बाटल्या (५४० बॉक्स) बेकायदा वाहतूक करताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सासवड विभागाने खेडशिवापूर येथे सातार- पुणे रस्त्यावर जप्त केले आहे. या कारवाई सुमारे दीड कोटी रुपयांचा मद्य आणि ट्रक जप्त केल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक चरणसिंग राजपुत (State Excise Superintendent Charan Singh Rajput) यांनी दिली. (Stock of liquor produced in Goa state seized in Pune) 

 

 

सातारा – पुणे महामार्गावर गेवा राज्यात निर्मित आणि विक्रीसाठी असलेला मद्यासाठी एका ट्रकमधून वाहतूक केला जाणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार त्यांनी खेड शिवापूर टोलनाक्याजवळ वाहनांची तपासणी करत होते. यावेळी एका संशयित ट्रक चालकाने उडवाउडवीचे उत्तर दिल्याने अधिकाऱ्यांचा संशय अधिक बळावला. त्यावेळी गाडीची झडती घेतल्यास. त्यात मद्यासाठी मिळून आला. विशे म्हणजे या ट्रकमधून सौंदर्य प्रसाधने वाहतूक केले जात असल्याचे कागदपत्रे होता. मात्र, प्रत्यक्षात मद्य वाहतूक केली जात असल्याचे समोर आले आहे.

 

 

वाहन चालकांकडे मदय वाहतुकीचे संदर्भातील कोणताही वाहतुक पास, परवाने अथवा कोणतीही कागदपत्रे मिळुन आली नाहीत. तसेच सदरचा मदयसाठा विक्री करण्याचे उददेशाने वाहतुक करुन आणल्याचे आरोपीच्या तपासातुन स्पष्ट झाल्याने त्याच्या विरुध्द गुन्हा नोंद करुन विदेशी मदयाचा एकुण १ कोटी २८ लाख १ हजार ६०० रुपये किंमतीच्या मुददेमालासह एक १४ चाकी ट्रक तसेच एक मोबाईल असा एकुण रु. १ कोटी ५१ लाख ६ हजार ६०० रुपये किंमतीचा मुददेमाल जप्त केला असून वाहनचालक सुनिल चक्रवर्ती या आरोपीला अटक केली आहे.

 

 

खेड शिवापूर गावचे हद्दीत, हॉटेल जगदंब समोर, सातारा-पुणे हायवे रोडलगत ट्रक क्रमांक एचआर ६३ डी ८८७८ हा १४ चाकी ट्रक थांबवुन वाहन चालकांकडे वाहनामध्ये काय आहे याबाबत चौकशी केली असता, वाहन चालक यांनी संशयित रित्या उत्तर दिल्याने वाहन रोडच्या बाजुस घेवुन तपासणी केली असता, वाहनामध्ये गोवा राज्यात निर्मित व विक्रीस असलेले रॉयल ब्लु माल्ट व्हिस्कीच्या १८० मिली क्षमतेच्या ७९,६८० सिलबंद बाटल्या (१६६० बॉक्स), रॉयल ब्लु माल्ट व्हिस्कीच्या ७५० मिली क्षमतेच्या ६४८० सिलबंद बाटल्या (५४० बॉक्स) मिळून आले.

राज्य उत्पादन शुल्कचे विभागीय उप-आयुक्त सागर धोमकर आणि अधीक्षक चरणसिंग राजपुत यांच्या मार्गदर्शनात राज्य उत्पादन शुल्क, सासवड विभागाचे निरीक्षक यांनी कारवाई केली. त्यामध्ये दुय्यम निरीक्षक प्रदीप मोहिते, राम सुपेकर, रोहित माने, धवल गोलेकर, सहाय्यक दुय्यम निरीक्षक सागर दुर्वे, संदीप मांडवेकर, जवान भागवत राठोड, तात्या शिंदे, समीर पडवळ, अक्षय म्हेत्रे, रणजित चव्हाण, राम चावरे, सुनील कुदळे, दत्तात्रय पिलावरे, अंकुश कांबळे यांनी सहभाग घेतला.

Local ad 1