पुणे : राज्यात भूमि अभिलेख विभागाने (State Land Records Department) मागील तीन वर्षापूर्वी कात टाकली असून, नागरिकांच्या सेवेसाठी नव्याने डिजीटल सुविधा (Digital facilities) अंमलात आणली आहे. अनेक अडथळे, परिश्रम पार करत दीर्घ कालावधीनंतर या सुविधेचा जनमानसात सहजतेने वापर होत असल्याचे दिसून येत आहे. सोमवारी एका दिवसात तब्बल एक लाख 64 हजार 742 डिजीटल सेवेचा घरसबल्या लाभ घेतल्याने आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी राज्य शासनाला 31 लाखांपेक्षा अधिक महसूल प्राप्त झाला आहे.
राज्याच्या महसूल विभागाकडून (State Revenue Department) नागरिकांना ऑनलाईन सेवा उपलब्ध करून देण्यासाठी विविध विभागांतर्गत कामकाज सुरू आहे. त्यातच भूमि अभिलेख विभागाकडून डिजीटल स्वाक्षरीयुक्त सातबारा, आठ अ, फेरफार उतारे आणि प्रॉपर्टी कार्ड (Digitally signed 7/12, 8 A, Alteration Statements and Property Cards) घरबसल्या ऑनलाईन उपलब्ध करून दिले आहेत. (State Land Records Department Some facilities are available online)
Related Posts
जमिनीचे खरेदी विक्री व्यवहार किंवा इतर स्थावर मालमत्तेसंदर्भातील कामकाजासाठी तसेच पिक विमा, बियाणे खरेदी, नुकसानीच्या पंचनामान्यासाठी लागणारे कागदपत्रे सहज उपलब्ध करून दिल्याने नागरिकांना विशेषतः ग्रामीण भागातील शेतकर्यांना मोठा दिलासा मिळत आहे. (State Land Records Department Some facilities are available online)
ऑलनाईन डिजीटल सातबार, आठ अ किंवा फेरफार उतारा डाऊनलोड करण्यासाठी विभागाकडून केवळ 15 रुपये शुल्क आकारले जाते, तर प्रॉपर्टी कार्डसाठी 135 रुपये शुल्क आकारले जात आहे. सोमवारी राज्यभरातून तब्बल एक लाख 17 हजार 629 सातबारा उतारे, 35 हजार 489 आठ अ, दोन हजार 462 फेरफार उतारे, तर पाच हजार 892 प्रॉपर्टी कार्ड आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी डाऊनलोड करण्यात आले आहेत. आत्तापर्यंत एका दिवसात सर्वाधिक उतारे डाऊनलोड करण्यात आले असून, आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच भूमि अभिलेख विभागाला 31 लाख 29 हजार 120 रुपयांचा महसूल प्राप्त झाला असल्याची माहिती ई फेरफार प्रकल्पाच्या राज्य समन्वयक सरिता नरके यांनी दिली.
प्रकार डाऊनलोड उत्पन्न
सातबारा 117629 17 लाख 64 हजार 435
आठ अ 35489 5 लाख 32 हजार 335
फेरफार 2462 36 हजार 930
प्रॉपर्टी कार्ड 5892 7 लाख 95 हजार 420
एकूण 161472 31 लाख 29 हजार 120
सातबारा 117629 17 लाख 64 हजार 435
आठ अ 35489 5 लाख 32 हजार 335
फेरफार 2462 36 हजार 930
प्रॉपर्टी कार्ड 5892 7 लाख 95 हजार 420
एकूण 161472 31 लाख 29 हजार 120