वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांनी संप मागे न घेतल्याने राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय
मेस्मा कायदा कधी व का लावाल जातो, जाणून घ्या…
ऊर्जा मंत्री डॉ. राऊत यांनी आज व्हीसीद्वारे वीज कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. चर्चेसाठी मी एक पाऊल पुढे टाकले आहे,तुम्हीही एक पाऊल पूढे टाका,असे आवाहन त्यांनी यावेळेस संघटनांना केले होते. राज्यातील वीज कंपन्यांचे खासगीकरण होणार नाही अशी ग्वाहीही त्यांनी दिली होती. तसेच कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा असे आवाहनही केले होते. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी सर्व कर्मचारी संघटनासोबत उद्या दुपारी ३ वाजता मुंबईत एक बैठक बोलावण्यात आली होती. मात्र रात्रीपर्यंत वीज कर्मचाऱ्यांनी संप मागे न घेतल्याने उद्या दुपारी होणारी ही बैठक रद्द करण्याचा निर्णय डॉ. राऊत यांनी घेतला आहे. (The state government took a tough decision as power distribution workers did not call off the strike)