पुणे : राज्य विधानसभेचे अधिवेश आजपासून सुरू झाले आहे, मात्र, रविवारी सायंकाळी मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांची झालेल्या पत्रकार परिषदेत काय साध्य झाले. राज्य सरकारला शेतकऱ्यांविषयी काही देणे- घेणे नाही, अशी टिका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. (State Government has nothing to do with farmers : Prakash Ambedkar)
कोरेगाव भीमा चौकशी आयोगाच्या (Koregaon Bhima Inquiry Commission) सदस्यांची भेट घेतली त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
Maharashtra Shikshak Bharti 2023 । राज्यात तब्बल 50 हजार शिक्षकांची भरती होणार
पाऊस वेळेवर न झाल्यामुळे अद्यापही पेरणी अपूर्ण आहेत परंतु राज्यातील शिंदे सरकार शेतकऱ्यांविषयी काही बोलायला तयार नाही पावसाळी अधिवेशन च्या पूर्व संधीला झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांनी शेतकऱ्यांविषयी काही बोलले नाही ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे त्यांना दुबार पेरणी संकट त्यांच्यापुढे उभे राहिले आहात का असा सवाल करत प्रकाश आंबेडकर यांनी राज्य सरकारला शेतकऱ्यांविषयी काही देणे घेणे नाही अशी टीका केली.