कोरोना संदर्भात मार्गदर्शनासाठी नांदेड प्रशासनाने सुरु केले कंट्रोल रुम
नांदेड : नांदेड जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असून, नागरिकांनी स्वःतासह घरातील सदस्यांची काळजी घ्यावी. कोरोनासंदर्भात काही शंका असल्यास त्याचे निराकरण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंट्रोल रुम सुरु केली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डाॅ. विपिन इटनकर (Collector Dr. Vipin Itankar) यांनी दिली. (Nanded administration started control room for guidance regarding corona)
नांदेड जिल्ह्यामध्ये जिल्हा प्रशासनाच्या वतीने नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या कार्यालयांमध्ये covid-19 च्या अनुषंगाने मार्गदर्शन करण्यासाठी कंट्रोल रूम सुरू केली आहे. या कंट्रोल रूम चा दूरध्वनी क्रमांक 02462262626 असा आहे. या ठिकाणी ज्या नागरिकांना Covid 19 लक्षणे आहेत तसेच covid-19 संदर्भात शंकासमाधान केले जाणार आहे. सल्ला घ्यावयाचा आहे, त्यांच्यासाठी हे कंट्रोल रुम महत्वाची ठरणार आहे. (Nanded administration started control room for guidance regarding corona)
Related Posts