...

अनुसुचित जातीमधील स्टार्ट-अप नवसंकल्पनांना मिळणार ३० लाखाचे अनुदान : मिलिंद कांबळे

पुणे : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भारत सरकारच्या सामाजिक न्याय विभाग, IFC Venture फंड व दलित इंडीयन चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्री DICCI च्या वतीने अनुसूचित जातीतील उद्योजकांसाठी डॉ. आंबेडकर उद्योजक पुरस्कार व डॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्टार्ट-अप स्पर्धेचे संपूर्ण देशभरा आयोजन करण्यात येत आहे, अशी माहिती DICCI दलीत इंडीय चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीचे पद्मश्री मिलिंद कांबळे  (Padma Shri Milind Kamble) यांनी पत्रकार परिषदेत दिली. (Start-up innovations from Scheduled Castes will get a grant of Rs 30 lakh)

 

 

अनुसूचीत जातीच्या नवोदित उद्योजक व व्यवसायाभिमुख व्यक्तींना ही योजना तयार करण्यात आली आहे. देशाच्या विकासाल हातभार लावण्यासाठी रोजगारनिर्मिती करण्याचा उद्देश यशस्वी करण्यासाठी IFCI Venture ही संपूर्ण देशभरातील नोडल एजन्सी म्हणून काम करणार आहे. त्याला सहआयोजक म्हणून DICCI दलीत इंडीय चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्री ही संस्था पूर्ण तयारीने कार्यरत आहे, असे कांबळे यांनी सांगितले. (Start-up innovations from Scheduled Castes will get a grant of Rs 30 lakh)

 

भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण (MOSJE) च्या वतीने VCF-SC च्या अंतर्गत अनुसूचीत जातींच्या युवक युवतींसाठी आंबेडकर सामाजिक नवसंशोधन व उष्मायन मिशन ‘Ambedka Social Innovation and Incubation Mission (ASIIM)’ राबविण्यात येत आहे. ASIIM चा उद्देश् सन २०२४ पर्यंत एकुण १००० नव संकल्पना शोधून केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या (Departmen of Science and Technology) आणि अन्य नामांकित संस्थांच्या सहाय्याने ‘तंत्रज्ञान उद्योग उष्मायन (Technology Business Incubater) स्थापन करण्यात येणार आहे. या माध्यमातून अनुसूचीत जातींच्या युवक युवतींना तीन वर्षाच्या कालावधीमध्ये ३० लाख रूपये निधी कंपनीच्या समभाग (Equity) मध्ये वितरीत केला जाईल.

 

अनुसूचीत जातींच्या युवक युवतींच्या नवसंकल्पना आणि नवसंशोधनाचा वेध घेण्यासाठी आयएफसीआ व्हेंचर (IFCI Venture Implementing Agency) च्या माध्यमातून ‘आंबेडकर युवा उद्योजक लिग (Ambedkar Young Enterpreneures League-AYE League) ही राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. संपूर्ण देशभरातील मोठ्या शहरांमध्ये विविध संस्थांच्या मदतीने ही राष्ट्रीय स्पर्धा पार पडणार आहे.

AYE League ही स्पर्धा दोन टप्प्यांमध्ये संपन्न होणार आहे. फेब्रुवारी २०२२ व मार्च २०१२ या यान संपन्न होणार आहे. पहिल्या टप्प्यात ऑनलाईन अर्ज मागविण्यात येणार आहेत. तर दुसऱ्या टप्प्यात समक्ष किंवा ऑनलाईन स्पर्धा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) च्या संयुक्त भागीदारीतून पार पडेल, AYE League च्या आयोजनासाठी भागीदार म्हणून आयआयटी मद्रास, आयआयटी दिल्ली, आयआयटी मुंबई, आयआयटी कानपूर, आयआयटी खरगपूर, आयआयटी रूरकी, आयआयटी हैद्राबाद, आयआयटी गांधीनगर यांचा समावेश असेल. नवी दिल्ली येथे अंतिम स्पर्धा पार पडेल. ज्या ठिकाणी सहभागी व विजेत्या स्पर्धकांचा सत्कार केला जाणार आहे.

 

अनुसूचित जातीच्या युवक युवतींच्या नवसंशोधन व नवसंकल्पना ज्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांसाठी मदतशीर ठरतील त्या शोधण्यासाठी, तसेच ज्या संकल्पना उत्पादन आणि सेवा क्षेत्रासाठी उल्लेखनीय ठरतील अशा संकल्पना आणणाऱ्या उद्योजकांना पुरस्कृत करण्यासाठी आंबेडकर एक्सलन्स अवार्ड (Ambedkar Excellence Award) दिला जाणार आहे. हे पुरस्कार त्या नवसंशोधक व नवउद्योजकांना दिले जाणार आहेत. ज्यांनी मेक इंडिया (Make India) उपक्रमांतर्गत ज्यांनी सूक्ष्म, लघु व मध्यम (MSME) साठी पुरक नवसंशोधन व नवसंकल्पना शोधल्या आहेत. हे देशातील लाखो युवकांना प्रेरणादायी ठरू शकेल. नवी दिल्ली येथे भव्य सोहळ्यामध्ये आंबेडकर एक्सलन्स अॅवॉर्ड (Ambedkar Excellence Award) दोन टप्प्यांमध्ये वितरीत केले जातील.

 

आंबेडकर युवा उद्योजक लिग (Ambedkar Young Enterpreneures League-AYE League) आणि आंबेडकर एक्सलन्स अॅवॉर्ड (Ambedkar Excellence Award) मध्ये जास्तीत जास्त अनुसूचीत जातीच्या युवकांचा सहभाग वाढविण्यासाठी व देशाच्या अर्थ व्यवस्थेमध्ये योगदान देण्यासाठी ज्या त्या राज्यांमध्ये जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. (Start-up innovations from Scheduled Castes will get a grant of Rs 30 lakh)

 

 

आंबेडकर युवा उद्योजक लिग (Ambedkar Young Enterpreneures League AYE League) आणि आंबेडकर एक्सलन्स अॅवॉर्ड (Ambedkar Excellence Award) मध्ये जास्तीत जास्त अनुसूचीत जातीच्या युवकांचा सहभाग वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. (Start-up innovations from Scheduled Castes will get a grant of Rs 30 lakh)

 

www.ayel.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी .दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीज (Dalit Indian Chember of Commerce and Industries) सदर उपक्रम राज्यभर आणि देशभर दलित नव उद्योजकांना समावून घेण्यासाठी विविध प्रकारे काम करीत आहे. या पत्रकार परिषदेस डिक्की पश्चिम भारत अध्यक्ष अविनाश जगताप, पुणे शहर अध्यक्ष अनिल होवाळे, राष्ट्रीय महिला निमंत्रक सीमा कांबळे उपस्थित होते. (Start-up innovations from Scheduled Castes will get a grant of Rs 30 lakh)

Local ad 1