विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शाळा सूरू करा : कोळगिरे

नांदेड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरसकट शाळा बंद करण्यात आले आहोत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. ज्या गावांत कोरोना नाही, अशा गावांतील शाळा किमान 50 टक्के क्षमतेत सुरु कराने, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वताने कंधार तालुका आध्यक्ष अध्यक्ष साईनाथ कोळगिरे (Kandhar Taluka President Sainath Kolagire) यानी कंधार उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) आणि शिक्षण मंत्र्यांकडे केली आहे. (Start school to prevent educational loss of students : Kolagire)

सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने कडक निर्बंध घातले आहेत.या निर्बंधामध्ये सरसकट शाळा बंद केल्या आहेत. तसेच इयत्ता दहावी आणी बारावी चे वर्ग सूरू करण्यास परवानगी दिली आहे. वास्तवीक ज्या ठिकाणी कोरोनाचे रूग्ण नाहीत त्या गावातील शाळा सुरु केल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ग्रामीण भागातील शाळा सूरू कराव्यात, ऑनलाईन वर्ग सूरू ठेवण्यात मोठी अडचण असून, असंख्य पालकांकडे मोबाईल (Mobile) नाही, अनेक ठिकाणी नेटवर्कची समस्या आहे. चित्रपट गृह, नाट्यगृह, धार्मिक जागा, माॅल्स, हाॅटेल या सगळ्यांना ५० टक्के उपस्थितीत परवानगी असताना शाळा सरसकट बंद का करण्यात आल्या आहेत, असा सवाल कोळगिरे यांनी उपस्थित केला आहे. (Start school to prevent educational loss of students : Kolagire)

ऑनलाईन शिक्षण सर्वांना सोयीचे नसून प्रत्येक्ष वर्गात बसून शिक्षण घेणे हाच शिक्षणाचा योग्य मार्ग आहे. ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या लेखन, वाचन तसेच गणित विज्ञान या सारख्या विषयाच्या आकलनात उणीवा राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शाळा तात्काळ सुरु कराव्यात ,शाळेची वेळ कमी करणे, विद्यार्थ्यांचे छोटे-छोटे गट करून शिक्षण देणे, ग्रामीण भागातील शाळा सूरू ठेवणे आदी पर्यायाचा शासनाने विचार करून करावा, अशी मागणी केली आहे. यावेळी साईनाथ कोळगिरे, ज्ञानेश्वर मुंडे, बालाजी तोरणे, प्रदिप मंगनाळे, ज्ञानेश्वर श्रीमंगले, हानमंत गित्ते, दिपक गोरे, माधव जाधव, कांताराम आगलावे आदी उपस्थित होते. (Start school to prevent educational loss of students : Kolagire)

Local ad 1