एसटीला नोव्हेंबरमध्ये विक्रमी 941 कोटींचे उत्पन्न ; तोटा ही 11 हजार कोटींवर पोहोचला  

मुंबई । गाव खेड्यातील प्रवशांची जीवन वाहिनी असलेली एसटीला नोव्हेंबरमध्ये दिवाळी सणाच्या निमित्ताने प्रवाशांचा चढ-उतार वाढल्यामुळे तब्बल ९४१ कोटी रुपये इतके यंदाच्या वर्षातील सर्वाधिक उत्पन्न नोव्हेंबर महिन्यात एसटी महामंडळाला (Maharashtra State Road Transport Corporation) मिळाले आहे. या महिन्यात एसटीने दररोज सरासरी ६० लाख प्रवाशांची वाहतूक करून सुमारे ३१.३६ कोटी रुपये उत्पन्न प्रतिदीन प्राप्त केले आहे. (ST records record income of Rs 941 crore in November)