असा पहा दहावी परीक्षेचा निकाल (SSC Result)

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च शिक्षण मंडळामार्फत सन 2021 मध्ये इयत्ता दहावी (SSC Result) परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल शुक्रवारी (16 जुलै) दुपारी 1 वा. ऑनलाईन जाहीर होणार आहे, अशी माहिती राज्य शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली आहे. मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार http://reshul.mh-ssc.ac.in तसेच www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होणार आहे.

सन 2021 मध्ये इयत्ता 10 परीक्षा शासन निर्णयानुसार रद्द करण्यात आल्याने मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार इयत्ता 9 वीचा अंतिम निकाल, इयत्ता 10 वीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन व अंतिम तोंडी, प्रात्यक्षिक, अंतर्गत मूल्यमापन इत्यादीच्या आधारे माध्यमिक शाळांमार्फत विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुणदान करण्यात आले आहेत. त्यानुसार मंडळाने विहित कार्यपद्धतीनुसार या परीक्षेचा निकाल तयार करण्याची प्रक्रिया केली आहे. (SSC Result)

शासन निर्णय 28 मे 2021 मधील तरतुदीनुसार सन 2021 मधील दहावी परीक्षेस श्रेणीसुधार योजनेंतर्गत नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल तयार करण्यात आलेला नाही. या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या दोन संधीमध्ये या परीक्षेची गणना करण्यात येणार नाही. या विद्यार्थ्यांना पुढील एक / दोन संधी उपलब्ध राहतील असेही शिक्षण मंडळाने प्रसिद्धी पत्रकात स्पष्ट केले आहे. (SSC Result)

Local ad 1