महिला डॉक्टरच्या बेडरूम आणि बाथरूममध्ये आढळले (spy cameras) छुपे कॅमेरे
पुण्यात उघडकीस आली धक्कादायक प्रकार
पुणे : महिला डाॅक्टर रुग्णालयातून सायंकाळी घरी परतल्यानंतर बाथरूममधील ‘स्वीच ऑन’ केल्यानंतरही बल्ब लागला नाही. त्यानंतर केलेल्या चौकशीत धक्कादायक प्रकार समोर असून, बेडरुम आणि बाथरुमध्ये छुपे कॅमेरे (spy cameras) बल्बमध्ये लावण्यात आले होते. हा प्रकार समोर आल्याने महिलांच्या सुरक्षेचा (Question of women’s safety) प्रश्न निर्माण झाला आहे. spy cameras found in female doctor’s bedroom and bathroom
सातारा रस्त्यावरील भारती विद्यापीठ हॉस्पिटल कॅम्पसमधील स्टाफ क्वॉर्टरमध्ये हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी महिला डॉक्टरने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Bharti University Police Thane) त्यावरून अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Bharti University Hospital on Satara Road. The woman has lodged a complaint at the Bharati University Police Station) हा प्रकार सहा जुलैला सकाळी पावणेनऊ ते सायंकाळी सात वाजून २० मिनिटे या कालावधीत घडला.
फिर्यादी सकाळी ड्युटीला गेल्यानंतर अज्ञाताने बनावट चावीच्या सहाय्याने (With the help of fake keys) त्यांच्या घराचे कुलूप उघडून घरात प्रवेश केला. त्यानंतर संबंधिताने छुपे कॅमेरे (spy cameras) असलेले बल्ब घरात बसवल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.
फिर्यादी या भारती विद्यापीठ हॉस्पिटलमध्ये नोकरीस असून, विद्यापीठाच्या आवारातील क्वॉर्टरमध्येच राहतात. त्या सहा जुलैला सकाळी पावणेनऊच्या सुमारास घरातून बाहेर पडल्या. त्यानंतर त्या सायंकाळी सव्वासातच्या सुमारास घरी परतल्या. त्यानंतर फ्रेश होण्यासाठी त्या बाथरूममध्ये गेल्या असता, त्यांनी बल्ब लावण्यासाठी ‘स्वीच ऑन’ केला. मात्र, बल्ब लागला नाही. (spy cameras)