मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याची विशेष संधी
नांदेड : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 1 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारित विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादीचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. (Special opportunity to add name in voter list)
देगलूर विधानसभा मतदार संघाचे पोटनिवडणूक 2021 मुळे देगलूर या विधानसभा मतदार संघासाठी 1 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारित विशेष संक्षिप्त पुनरिक्षणाचा कार्यक्रम आयोगाकडून प्राप्त झाला असून या कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
Related Posts
देगलूर विधानसभा मतदार संघासाठी पुनरिक्षण कार्यक्रमाचे उपक्रम व कालावधी पुढीलप्रमाणे आहे. एकत्रित प्रारुप मतदार यादी प्रसिध्दीसाठी सोमवार 8 नोव्हेबर 2021 हा कालावधी आहे. दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी सोमवार 8 नोव्हेंबर 2021 ते मंगळवार 7 डिसेंबर 2021 आहे. विशेष मोहिमांचा कालावधी शनिवार 13 नोव्हेंबर ते रविवार 14 नोव्हेंबर 2021 व शनिवार 27 नोव्हेंबर ते रविवार 28 नोव्हेंबर 2021 असा आहे. दावे व हरकती निकाली काढणे सोमवार 27 डिसेंबर 2021 पर्यत आहे. मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी करण्यासाठी बुधवार 5 जानेवारी 2022 असा कालावधी आहे. (Special opportunity to add name in voter list)
या कार्यक्रमानुसार प्रारुप मतदार यादी 1 नोव्हेंबर 2021 रोजी प्रसिध्द करण्यात आलेली आहे. 13 व 14 नोव्हेंबर 2021 रोजी तसेच 27 व 28 नोव्हेंबर 2021 रोजी मतदाराचे नाव नोंदणीसाठी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमानुसार अंतिम मतदार यादी 5 जानेवारी 2022 रोजी प्रसिध्द करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी कळविले आहे. (Special opportunity to add name in voter list)