संशोधनासाठअवकाशात सोडलेले फुगे महाराष्ट्रात जमिनीवर येण्याची शक्यता, प्रशासनाने केले “हे” आवाहन
सांगली : टाटा इन्स्टिट्युट ऑफ फंडामेंटल रिसर्च हैद्राबाद (Tata Institute of Fundamental Research Hyderabad) या संस्थेकडून वैज्ञानिक संशोधनासाठी (Scientific research) दि. 1 नोव्हेंबर 2022 ते 30 एप्रिल 2023 या कालावधीत अवकाशात 10 बलून फ्लाईटस् सोडण्यात येत आहेत. सदरच्या बलून मध्ये वैज्ञानिक उपकरणे असून ठराविक कालावधीनंतर वैज्ञानिक उपकरणे (Scientific instruments) मोठ्या रंगीत पॅराशुटसह औरंगाबाद, बीड, नांदेड, उस्मानाबाद, परभणी, सांगली, सातारा, अहमदनगर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, जळगाव आणि सोलापूर जिल्ह्याच्या स्थलसिमा हद्दीत जमिनीवर खाली येण्याची शक्यता आहे. (Balloons launched in space for research are likely to land in Maharashtra)