सोयाबीनच्या उत्पादनात 50 टक्के घट ; “या” जिल्हा प्रशासनाने घेतला महत्वाचा निर्माण

नांदेड Nanded news : जिल्हयात 26 जुलै ते 16 ऑगस्ट या 21 दिवसाच्या कालावधीत पावसाने दडी मारली. (The district received no rainfall during the 21-day period from July 26 to August 16) त्यामुळे काही भागात सोयाबीनचे नुकसान दिसून आले. समितीने केलेल्या पाहणीत जिल्हयातील सर्व तालुक्यांमध्ये पिकांच्या उत्पादकतेमध्ये 50 टक्के पेक्षा जास्त घट अपेक्षित असल्याचा अंदाज व्यक्त केला केला आहे. त्यामुळे या संकटात शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. (Soybean production in Nanded district is likely to decline by more than 50 per cent) 

 

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर (Collector Dr. Vipin Itankar) यांनी जिल्हयातील सर्व तालुक्यांसाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना (Pradhan Mantri Pik Vima Yojana) सन 2021-22 अंतर्गत प्रतिकुल हवामान परिस्थिती (Mid-Season Adversity) अधिसुचना लागु केली आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या शासन निर्णयानुसार हंगाम कालावधीत प्रतिकुल परिस्थिती जसे पुर, पावसातील खंड, दुष्काळ आदी बाबींमुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षित उत्पन्नामध्ये सरासरी उत्पन्नाच्या 50 टक्के पेक्षा जास्त घट अपेक्षित असेल तर नुकसान भरपाईच्या प्रमाणात विमा धारक शेतकऱ्यांना 25 टक्के मर्यादेपर्यंत आगाऊ रक्कम देण्याची तरतुद आहे. त्याचा लाभ शेतकऱ्यांना होणार आहे. (Soybean production in Nanded district is likely to decline by more than 50 per cent) 

 

 

जिल्ह्यात पावसाच्या पडलेल्या खंडामुळे सोयाबीनच्या फुलांची गळ तर शेंगा परिपक्व न झाल्याने पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसुन आले आहे. अशास्थितीत जिल्हयातील पिक विमाधारक शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीच्या 25 टक्के आगाऊ रक्कम मिळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तात्काळ अधिसूचना काढण्याबाबत पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सूचना दिल्या होत्या. विमाधारक शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी ही अधिसुचना लागु केली आहे. (Soybean production in Nanded district is likely to decline by more than 50 per cent) 

 

तालुकानिहाय सायोबिन उत्पादकतेत घट ( टक्केवारी)

नांदेड तालुका 62.33, अर्धापुर 55.00, मुदखेड 61.67, बिलोली 61.98, धर्माबाद 61.74, नायगाव 60.00, मुखेड 60.37, कंधार 61.69, लोहा 64.00, हदगाव 59.75, हिमायतनगर 66.65, भोकर 64.73, उमरी 60.27, देगलूर 60.72, किनवट 68.79, माहूर 67.19 याप्रमाणे सरासरी उत्पादकतेच्या तुलनेत घट अपेक्षित आहे.
–  रविशंकर चलवदे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नांदेड

Local ad 1