सोयाबीन (soybean ) पिकांवर किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी “हे” करा

नांदेड : सोयाबीन पिकावर गेल्यावर्षी चक्री भुंगा किडीचा प्रादुर्भाव आढळून आला  होता. (Last (year, the soybean crop was found to be infested with cyclic weevils.) यावर्षीही या किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे.तसेच किडाची प्रादुर्भाव रोखण्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे, याविषयी कृषी विभागाने मार्गदर्शन केले आहे.

 

किडीचा प्रादुर्भावामुळे असे होते मुकसान

चक्री भुंगा ही कीड पीकवाढीच्या सुरुवातीच्या अवस्थेत देठ, फांदी व मुख्य खोडावर दोन समांतर खाचा करुन त्यामध्ये अंडी घालते. यामुळे झाडाचा अन्न पुरवठा बंद होऊन वरील भाग वाळून जातो. अळी देठ, फांदी व खोड पोखरुन जमिनीपर्यंत पोहोचते व पुर्ण झाड वाळून जाते. वेळेवर उपाययोजना न केल्यास मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. (Last year, the soybean crop was found to be infested with cyclic weevils.)

चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव आढळल्यास अशी घ्या काळजी
चक्रीभुंग्याच्या प्रादुर्भावामुळे किडग्रस्त पाने फांद्या वाळतात. अशी कीडग्रस्त झाडे, पाने, फांद्या यांचा आतील किडीसह नायनाट करावा. यापद्धतीचा 15 दिवसातून जर दोनदा अवलंब केला तर चक्रीभुंगा या किडीमुळे होणाऱ्या नुकसानीचे प्रमाण कमी होते. चक्री भुंग्याच्या किडीने अंडी घालू नये यासाठी सुरुवातीलाच 5 टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. पीक पेरणीच्या 30-35 दिवसांनतर प्रादुर्भाव दिसताच इथियॉन 50 टक्के, 30 मिली प्रति 10 लिटर अथवा थायक्लोप्रीड 21.7 एस. सी. 15 मिली प्रति 10 लिटर अथवा क्लोरांट्रॅनिलीप्रोल 18.5 एस. सी. 3 मिली प्रति 10 लिटर अथवा थायमेथोक्झाम 12.6 टक्के अधिक लॅम्ब्डा सायहॅलोथ्रीन 9.5 टक्के झेड. सी 2.5 ग्रॅ. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी केले आहे. (soybean crop)

Local ad 1