Nanded News । नांदेड जिल्ह्यात काहींसा दिलासा ; 36 कोरोना बाधित आढळले

Nanded News नांदेड : बुधवारी नांदेड जिल्ह्यातील 45 कोरोना रुग्ण सापडले होतेे. तर गुरुवारी 36 रुग्ण आढळले आहेत. त्यातील 12 रुग्ण नांदेड महापालिका क्षेत्रातील असून, उर्वरित रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. त्यामुळे आता ग्रामीण भागातील नागरिकांना अधिक काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. (Some relief in Nanded district; 36 corona were found infected) 

जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 928 अहवालापैकी 36 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 28 तर अँटिजेन तपासणीद्वारे 8 अहवाल बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 682 एवढी झाली असून यातील 87 हजार 890 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 137 रुग्ण उपचार घेत असून 5 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. (Some relief in Nanded district; 36 corona were found infected)

 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 655 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 12, नांदेड ग्रामीण 1, बिलोली तालुक्यांतर्गत 1, माहूर 1, मुदखेड 6, नायगाव 1, चंद्रपूर 1, हिंगोली 3, परभणी 1, पुणे 1 तर ॲटीजन तपासणीद्वारे नांदेड मनपा 2, किनवट 4, मुदखेड 1, कंधार 1 असे एकुण 36 कोरोना बाधित आढळले आहे. आज जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 1, खाजगी रुग्णालयातील एका कोरोना बाधिताला औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली. (Some relief in Nanded district; 36 corona were found infected)

 

 

आज 137 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपूरी 7, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 2, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 15, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 108, खाजगी रुग्णालय 5 अशा एकुण 137 व्यक्ती उपचार घेत आहेत.

Local ad 1