पुणे : महाराष्ट्रामध्ये ५० टक्के क्षेत्र हे अवर्षणग्रस्त आहे. तेथे पाण्याची कमतरता आहे. जलसंधारण ही एकमेव गोष्ट या भागाचा प्रश्न सोडवू शकते. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी पाण्याच्या प्रश्नाची सोडवणूक करणे गरजेचे आहे, असे मत माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केले. (Solving the water issue is necessary to prevent farmer suicides: Devendra Fadnavis)
जल, जंगल, जमिनीसाठी भारतीय जैन संघटनेने योगदान द्यावे : शरद पवार
हा कार्यक्रम केवळ समाजाचा नाही तर भारताच्या ‘जीडीपी’चा सकल राष्ट्रीय उत्पादनाचा आहे. देशाला आर्थिक महासत्ता करण्याचा रस्ता जैन समाजाच्याच मार्गानेच जातो. जैन समाज दातृत्वामध्ये अग्रणी आहे. नि:स्वार्थ सेवा हा त्यांचा गुण आहे. केवळ सरकार सर्व काही करू शकणार नाही हे ध्यानात घेऊन भारतीय जैन संघटना आणि पानी फाउंडेशनने जलसंधारणामध्ये काम केले आहे. मानवी बुद्धिमत्तेचा वापर आपण करणार नसू तर, कृत्रिम बुद्धिमत्तेचा काहीही उपयोग होणार नाही. सज्जनशक्तीच्या पाठीशी राहणे हे कर्तव्यच नाही तर जबाबदारी आहे, या भावनेतून कार्यक्रमाला उपस्थित असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
पानी फाउंडेशनच्या कामाला फडणवीस यांनी गत आठ वर्षांपासून प्रोत्साहन दिले. महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी या क्षेत्रात आणखी काम करण्याची संधी मिळाली आहे. आम्ही कृषी क्षेत्रातही भरीव काम करणार आहोत.
– आमिर खान, प्रसिद्ध अभिनेते आणि पानी फाउंडेशनचे विश्वस्त