...

सामाजिक संस्थांनी राज्यातील ७५० अंगणवाड्या दत्तक घेतल्या

मुंबई : लोकसहभागातून अंगणवाडी दत्तक (Anganwadi adoption) घेण्यासाठी अनेक सामाजिक संस्था (Social organizations) पुढे येत आहेत. अंगणवाड्यांचा विकास होण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे. राज्यातील विविध दहा सामाजिक संस्थांच्या (Social Institutions) माध्यमातून ७५० अंगणवाड्या दत्तक देत आहोत. अंगणवाडी दत्तक धोरणांतर्गत (Anganwadi Adoption Policy) ऑक्टोबर २०२२ पासून विविध सामाजिक संस्थांनी आतापर्यंत ३ हजार ६६८ अंगणवाड्या दत्तक घेतलेल्या आहेत  त्यामुळे राज्यात एकूण ४ हजार ४१८ अंगणवाड्यांचा विकास होण्यास सामाजिक संस्थाचे सहकार्य मिळत असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा (Minister for Women and Child Development Mangalprabhat Lodha) यांनी दिली. (Social organizations have adopted 750 Anganwadis in the state)

 

 

     लोढा म्हणाले, राज्यात १ लाख १० हजार ४४६ अंगणवाड्या कार्यरत आहेत. राज्याच्या महिला आणि बाल विकास विभागाने लोकसहभागातून ‘अंगणवाडी दत्तक’ धोरण आणले आहे. सर्वच अंगणवाड्यांचा विकास व्हावा यासाठी शासन प्रयत्नशील आहे. या धोरणातंर्गत कॉर्पोरेट संस्था कॉर्पोरेट सामाजिक दायित्व निधी (Corporate Social Responsibility Fund),अशासकीय स्वयंसेवी संस्था,ट्रस्ट इ. आणि व्यक्ती,कुटुंब आणि  समूहांच्या माध्यमातून गुंतवणूक करू शकतात. (Social organizations have adopted 750 Anganwadis in the state)

कोणत्या आहेत त्या संस्था

 दालमिया फांउडेशन (Dalmia Foundation) यांनी सोलापूर-कोल्हापूर मधील १० अंगणवाड्या दुरूस्तीसाठी, भागीरथी फांउडेशनने (Bhagirathi Foundation) पुणे, सोलापूर, कोल्हापूर येथे १५ अंगणवाडी दुरूस्तीसाठी, कॉरबेट फाउंडेशन (Corbett Foundation Pune) पुणे येथे १६ अंगणवाड्या दुरूस्तीसाठी व पूर्व शालेय शिक्षण, युनायटेड वे ऑफ हैद्राबाद (United Way of Hyderabad) यांनी पुणे येथील २० अंगणवाडी दुरूस्ती व क्षमता वृद्धी, आर.एस.एस.जनकल्याण समितीने मुंबई (RSS Jankalyan Samiti Mumbai) उपनगर मधील  २५ अंगणवाडी बळकटीकरण, होप फॉर दि चिल्ड्रेन (Hope for the Children) यांनी पुणे येथे ४१ अंगणवाडी दुरूस्ती व क्षमता वृध्दी, युनायटेड वे दिल्ली (United Way Delhi) पुणे ४५ अंगणवाडी दुरूस्ती, रोटरी डिस्ट्रीक्ट ३१३१  यांनी पुणे येथील १०० अंगणवाडी दुरुस्ती, के कॉर्प फांउडेशन  गडचिरोली, नंदुरबार १७९ अंगणवाडी दुरूस्ती आणि न्युट्रीशियन, यार्दी फाउंडेशन पुणे ३०० अंगणवाडी दुरूस्ती, न्युट्रीशियन, जीवनंदन फाऊंडेशन (Jeevanandan Foundation) यांनी पुणे येथील सहा अंगणवाड्या, मुस्कान प्रतिष्ठाणने मुंबई उपनगर येथील सात अंगणवाड्या तसेच क्षमता वृद्धीसाठी अंगणवाडी दत्तक घेतल्या आहेत.

 

जिल्हा आणि नागरी बाल विकास प्रकल्प अधिका-यांचा सत्कार

   पोषण ट्रॅकर अप्लिकेशनमध्ये (Nutrition tracker application) लाभार्थ्यांची आधार सिडींगमध्ये यशस्वी नोंद घेतलेल्या भंडारा जिल्ह्याचा ९८ टक्के नोंद केल्याबद्दल प्रथम क्रमांक, पालघरमध्ये ९७ टक्के नोंद केल्याबद्दल द्वितीय क्रमांक, हिंगोली जिल्ह्याचा ९६ टक्के नोंद केल्याबद्दल तृतीय क्रमांक आहे.

नागरी प्रकल्पामध्ये तुंगा मोहिली, मुंबईमध्ये ९९ टक्के नोंद  असल्याने प्रथम क्रमांक, घाटकोपर १ मुंबई ९८.२ टक्के नोंद असल्याने द्व‍ितीय क्रमांक, तर दापोडी बोपोडी मुंबई ९८ टक्के नोंद असल्याने तृतीय क्रमांक आहे. या जिल्ह्यांना व नागरी बाल विकास प्रकल्पांना प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

 पुणे १ नागरी प्रकल्पच्या महिला व बालविकास अधिकारी सुहिता ओव्हाळ यांनी सीएसआर सहभाग वाढविल्या बद्दल प्रशस्तीपत्र देवून सत्कार करण्यात आला. यावेळी एकात्मिक बाल विकासच्या आयुक्त रूबल अग्रवाल, उपआयुक्त विजय क्षीरसागर, दालमिया फाउंडेशन,भागीरथी फांउडेशन, कॉरबेट फाउंडेशन, युनायटेड वे ऑफ हैद्राबाद,आर.एस.एस.जनकल्याण समिती, होप फॉर दि चिल्ड्रेन, युनायटेड वे दिल्ली, रोटरी डिस्ट्रीक्ट,के कॉर्प फांउडेशन, जीवनंदन फाऊंडेशन आणि मुस्कान प्रतिष्ठाण, यार्दी फाउंडेशन यांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

Local ad 1