...

(Sludge-free lake) तलावातील गाळ शेतकऱ्यांनी घेऊन जावा : जिल्हाधिकारी

नांदेड : धरणामधील दरवर्षी साठत चाललेल्या गाळामुळे त्यातील पाणी साठवण क्षमतेत घट होत आहे. त्यामुळे गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवाय मोहिम राबविण्याचा येत आहे. (Sludge-free lake) नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी धरणातील हा सुपिक गाळ घेऊन जाण्यासाठी मागणी नोंदवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले. The silt from the lake should be taken away by the farmers : Collector

नांदेड जिल्ह्यात गोदावरी, पैनगंगा, मन्याड, लेंडी सारख्या मोठ्या नद्या व इतर लहान नद्या वाहतात. सिंचन सुविधेच्यादृष्टिने जिल्ह्यात अनेक ठिकाणी लहान-मोठी धरणे बांधण्यात आली आहेत. पावसाच्या असमतोलनामुळे जिल्ह्यातील काही धरणे ही कोरडी झाली आहेत. हे लक्षात घेता त्यातील गाळ (Sludge-free lake) काढण्याची मोहिम सुरु करण्यात आली आहे. The silt from the lake should be taken away by the farmers : Collector

सद्यस्थितीत जिल्हा परिषदेअंतर्गत असलेल्या 335 तलावापैकी 94 तलाव गाळ काढणे योग्यय आहे. या तलावात एकूण 10 लाख 44 हजार क्युमबिक मिटर इतका गाळ आहे. तसेच जिल्हा जल व मृद संधारण विभागाकडे 16 तलाव असून त्यामध्येद 42 हजार 67 घनमीटर गाळ आहे. हा गाळ काढण्यासाठी येत्या 20 दिवसात गाळ काढणे व शेतकऱ्यांच्याय शेतात टाकण्या साठी शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन त्याठनुसार याद्या व इतर नियोजन केले जात आहे. The silt from the lake should be taken away by the farmers : Collector

या कामासाठी मोठ्या प्रमाणात लोकसहभाग घेतला जात असून, यात संस्कृती संवर्धन मंडळ सगरोळी, अनुलोम आदी संस्थांच्या माध्यमातून आतापर्यंत 12 तालुक्यातील 48 गाव / पाझर तालावातील गाळ काढण्याचे काम प्रगतीवर आहे. यातून सुमार 3.35 घनमीटर गाळ (Sludge-free lake) काढण्यात आलेला असून सदरचा सुपिक गाळ 271.20 हेक्टर क्षेत्रावर टाकण्यात आलेला आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात गाळ घेऊन जाण्यासाठी पुढे यावे व याबाबत संबंधित तालुक्यातील तहसिलदार यांच्याकडे मागणी नोंदवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. The silt from the lake should be taken away by the farmers : Collector

Local ad 1