पुण्यात इमारतीचा स्लॅब कोसळून 5 कामगार ठार

पुणे : बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा स्लॅब कोसळून 5 कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना येरवडामधील शास्त्रीनगरमध्ये असलेल्या गल्ली क्रमांक आठमध्ये गुरुवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन शोक व्यक्त केला आहे. (Six workers killed in Pune building slab collapse)

 

 

स्लॅब कोसळल्याची माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. स्लॅबचा ढिगारा आणि सळयांमध्ये अडकलेल्या कामगारांना पोलिस प्रशासन आणि अग्निशमन दलाकडून बाहेर काढण्यात आले. काही कामगार या सळयांमध्ये अडकल्याने सळया कापून त्यांना बाहेर काढल्याची माहिती अग्नीशमन दलाकडून देण्यात आली. (Six workers killed in Pune building slab collapse)

 

 

घटना कुठे घडली..

शास्त्रीनगर चौकतील वाडिया बंगला गेट नंबर आठ येथील नवीन इमारतीचा स्लॅब भरण्याचे काम सुरु होते. काम सुरू असताना अचानक स्लॅब कोसळला आहे. त्यामुळे ही दुर्घटना घडली.  (Six workers killed in Pune building slab collapse)

 

पोलिस गुंतले तपासात

 बांधकाम सुरू असताना कामगारांच्या सुरक्षेसाठी आवश्यक असलेली खबरदारी बांधकाम प्रकल्पावर घेण्यात आली होती की नाही याचा पोलिस तपास करत आहे. (Six workers killed in Pune building slab collapse)

दुर्घटनेबद्दल पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

पुण्यातील एका बांधकामग्रस्त इमारतीत झालेल्या दुर्घटनेने अतीव दुःख झाले. शोकाकुल कुटुंबियांचे मी सांत्वन करतो. मला आशा आहे की या दुर्घटनेत जखमी झालेले सर्व जण लवकरात लवकर बरे होतील. (Six workers killed in Pune building slab collapse)

Local ad 1