नांदेड कोरोना अपडेट : सहा कोरोना बाधित आढळले

नांदेड Nanded news : गेल्या काही दिवस एक-दोन कोरोना बाधित आढळत होते. त्यामुळे आता नांदेड जिल्हा कोरोनामुक्त होतोय, असे वाटत असतानाच रविवारी प्राप्त झालेल्या अहवालातुन चिंता वाढली आहे. 853 अहवालापैकी 6 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. त्यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 5 तर अँटिजेन तपासणीद्वारे 1 अहवाल बाधित आले आहेत. (Six corona were found infected in Nanded district) 

 

नांदेड जिल्ह्यात एकुण कोरोना बाधितांची संख्या 90 हजार 759 एवढी झाली असून यातील 88 हजार 71 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर सध्या 26 रुग्ण उपचार घेत असून, एका बाधितांची प्रकृती अतिगंभीर असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. (Six corona were found infected in Nanded district)

 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 662 एवढी आहे. आज 26 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 6, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 7, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 9, खाजगी रुग्णालय 4 व्यक्ती उपचार घेत आहेत. (Six corona were found infected in Nanded district)

Local ad 1