...

साहेब, आम्हाला गांजाची शेती करू द्या.. शेतकर्‍यांकडे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे मागणी

नाशिक : राज्यातील अवकाळी पाऊस झाल्याने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील शेतीचीही समावेश आहे. अवकाळी पावसामुळे द्राक्षांचे मोठे नुकसान झाले असून, त्यामुळे हे पीक घेणे परवडत नाही. आम्हांला आता गांजा शेती करायची परवानगी द्या, अशी मागणी राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार  (Agriculture Minister Abdul Sattar)  यांच्याकडे केली. यावेळी सत्तार यांनी थातूर-मातूर उत्तर देऊन त्या ठिकाणावरून काढता पाय घेतला. (Sir, give permission to cultivate cannabis… Demand of farmers to Agriculture Minister Abdul Sattar)

 

 

चार महिन्यांपूर्वी सोयाबीनचे नुकसान झाले त्याची ही नुकसान भरपाई अजून मिळाली नाही. तर आता झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. कृषी मंत्री अब्दुल सत्तार हे वेळेच्या तीन तास उशिरा नुकसानीची पहाणी करण्यासाठी आले. त्यामुळे संतापलेल्या शेतकर्‍यांना प्रश्नांचा भडिमार सुरू केला. त्यामुळे सत्तार यांनी आपला अवघ्या पाच मिनिटात आटोपता घेतला. त्यात केवळ एकाच गावातील शेतकर्‍यांची भेट घेतली. तर इतर गावांतील शेतकर्‍यांची भेट घेणे टाळल्याची चर्चा नाशिक जिल्ह्यात सुरू झाली आहे.  (Sir, give permission to cultivate cannabis… Demand of farmers to Agriculture Minister Abdul Sattar)

 

 

निफाड येथील शेतकर्‍यांनी अब्दुल सत्तार  (Agriculture Minister Abdul Sattar)  याची चांगलीच कोंडी केली. कृषी मंत्री महोदय आम्हांला आता द्राक्षाची शेती परवडत नाही आम्हांला गांजाची शेती करण्याची परवानगी द्या अशीही काही शेतकर्‍यांनी संतप्त होत मागणी केली आहे. त्यात आम्हांला भरपाई कधी मिळणार असा सवाल करत असताना अब्दुल सत्तार यांनी ठोस आश्वासन न दिल्याने शेतकरी चांगलेच भडकले होते.  (Sir, give permission to cultivate cannabis… Demand of farmers to Agriculture Minister Abdul Sattar)

Local ad 1