माईची लेकरे अनाथ झाली ; सिंधुताई सपकाळ यांचे पुण्यात निधन । Sindhutai Sapkal dies in Pune

पुणे : अनाथांची आई असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkal) यांंचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. 73 वर्षांच्या होत्या, रात्री 8 वाजून 10 मिनिटांनी त्यांनी पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. (Sindhutai Sapkal dies in Pune)

 

 

चिंता वाढवणारी बातमी : नांदेड जिल्ह्यात एका दिवसात तिपटीने वाढले कोरोना बाधित

 

पुण्यातील गॅलक्झी हॉस्पिटलमध्ये निधन झाले, महिना भरापूर्वी त्यांचे हर्नियाचे ऑपरेशन झाले होते. त्यांनंतर त्यांच्यावर उपचार सुरु होते. आज अखेर ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांनी अनाथ मुलांसाठी केलेल्या उल्लेखनिय कार्यासाठी 2012 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार मिळाला होता. तर 2021 साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने (Padma Shri in 2021 in Social Work category) सन्मानित करण्यात आले होते. (Sindhutai Sapkal dies in Pune)

 

नांदेड-हडपसर एक्सप्रेस रेल्वेचे असे आहे वेळापत्रक, जाणून घ्या !

 

 जेमतेम मराठी शाळेत चौथीपर्यंत शिकता आलं होतं. वयाच्या नवव्या वर्षी त्यांचं लग्न झालं होतं. त्यांच्या आयुष्यातील संघर्षाने त्यांना समाजसेवेकडे वळवल्या होत्या. अनाथ मुलांना सांभाळून त्यांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी सिंधुताई यांनी ममता बाल सदन संस्थेची स्थापना केली होती. १९९४ साली पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावात ही संस्था सुरु झाली. आपली कन्या ममता हिला दगडूशेठ हलवाई संस्थेच्या माध्यमातून शिक्षणासाठी सेवासदन येथे दाखल केले आणि त्यांनी इतर अनाथ आणि बेवारस मुलांना आधार दिला. (Sindhutai Sapkal dies in Pune)

Local ad 1