पुणे : बनावट कागदपत्रांच्या (forged documents) आधारे मिळवलेले फोनचे सीमकार्ड (SIM card) सायबर गुन्ह्यांसाठी (Cyber crime) वापरले जातात, हे तर उघड सत्य आहे. असे बनावट सीमकार्डस तयार करणारे लोक आता या गैरव्यवहारात इतके सरावले आहेत, की त्यांनी अशा प्रकारची बनावट ओळखपत्र/ बनावट पत्ते दाखवणारी कागदपत्रे तयार केली आहेत. फेशियल रेक्गनिशन पॉवर्ड सोल्युशनने (ASTR) 21 हजार 31 सिम कार्ड कायमची बंद केली आहेत. (Crackdown on SIM card holders based on fake documents)
ASTR प्रकल्पामागचे उद्दिष्ट सर्व प्रकारच्या दूरसंचार सेवा प्रदात्यांच्या ग्राहकांचे एकत्रित विश्लेषण करणे,आणि विश्वासार्ह नसलेले मोबाईल क्रमांक ओळखून त्यातून ते वजा करण्याचे काम केले गेले. या सिस्टिममध्ये दूरसंचार कंपन्यांनी, दूरसंचार विभागाला दिलेल्या ग्राहकांचा डेटाबेस वापरुन, एकच चेहरा आणि त्याचे वेगवेगळे क्रमांक ओळखले जातात.
याच प्रणालीचा वापर करत, महाराष्ट्र एलएसएने दूरसंचार विभागाच्या ग्राहक डेटाबेसचे विश्लेषण केले आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे जारी केल्याचा संशय असलेले एकूण 21031 सिम ओळखून ती रद्द केली गेली. (The SIM card was canceled on the basis of forged documents)