(Shocking) धक्कादायक: 29 वर्षिय तरुणासह 18 जाणांचा कोरोनाने मुत्यू (Corona kills 18, including 29-year-old)
नांदेड : जिल्ह्यात रविवारी 4 हजार 299 चाचण्याचे अहवाहल प्राप्त झाले असून, त्यातील 1 हजार 310 व्यक्तींचे अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. तर 18 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, धक्कादायक म्हणजे त्यात एका 29 तरुणांचा समावेश आहे. (Corona kills 18, including 29-year-old)
गुरुवार 25 मार्च 2021 रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे चिखलवाडी नांदेड येथील 74 वर्षाचा पुरुष, शुक्रवार 26 मार्च रोजी सिद्धीविनायक अपार्टमेंट नांदेड येथील 58 वर्षाची महिला, लोहा तालुक्यातील चितळी येथील 60 वर्षाची महिला, इंदिरानगर लोहा येथील 55 वर्षाचा पुरुष, सिडको नांदेड येथील 25 वर्षाचा पुरुष, लोहा तालुक्यातील बोरगाव येथील 65 वर्षाचा पुरुष, तरोडा बु नांदेड येथील 76 वर्षाचा पुरुष, बळीरामपुर नांदेड येथील 50 वर्षाचा पुरुष, होळी नांदेड येथील 82 वर्षाचा पुरुष, तर शनिवार 27 मार्च रोजी जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे हिंगोली नाका नांदेड येथील 29 वर्षाचा पुरुषाचा समावेश आहे. (Corona kills 18, including 29-year-old)
भोकर येथील 52 वर्षाचा पुरुष, आंबेडकरनगर नांदेड येथील 65 वर्षाची महिला, भगतसिंगरोड नांदेड येथील 85 वर्षाचा पुरुष, गुरुद्वारा गेट नंबर 4 नांदेड येथील 50 वर्षाची महिला, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथे दिलीपसिंग कॉलनी नांदेड येथील 70 वर्षाचा पुरुष, हदगाव कोविड रुग्णालय येथे हदगाव तालुक्यातील पाथरड येथील 60 वर्षाची महिला, हदगाव तालुक्यातील तामसा येथील 50 वर्षाची महिला तर पुर्णारोड नांदेड येथील 48 वर्षाचा पुरुषाचा खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत्त रुग्णांची संख्या 731 एवढी झाली आहे. (Corona kills 18, including 29-year-old)
108 बाधितांची प्रकृती गंभीर
जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 39 हजार 908 एवढी झाली असून यातील 29 हजार 273 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 9 हजार 670 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 108 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. (Corona kills 18, including 29-year-old)
अँक्टीवर रुग्णांमध्ये वाढजिल्ह्यात 9 हजार 670 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 290, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 86, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) 92, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड 119, किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 108, मुखेड कोविड रुग्णालय 163, देगलूर कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 28, जैनम-देगलूर कोविड केअर सेंटर 52, बिलोली कोविड केअर सेंटर 144, नायगाव कोविड केअर सेंटर 63, उमरी कोविड केअर सेंटर 44, माहूर कोविड केअर सेंटर 17, भोकर कोविड केअर सेंटर 2.
हदगाव कोविड रुग्णालय 33, हदगाव कोविड केअर सेंटर 53, लोहा कोविड रुग्णालय 97, कंधार कोविड केअर सेंटर 18, महसूल कोविड केअर सेंटर 97, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 7, धर्माबाद कोविड केअर सेंटर 67, मुदखेड कोविड केअर सेंटर 46, अर्धापूर कोविड केअर सेंटर 24, बारड कोविड केअर सेंटर 17, मांडवी कोविड केअर सेंटर 18, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 6 हजार 29, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 1 हजार 473, खाजगी रुग्णालय 482, लातूर येथे संदर्भीत 1 आहेत. रविवार 28 मार्च 2021 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 9, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड 10, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 14 एवढी आहे.