...

धक्कादायक : ओमायक्रॉनचा लातूरमध्ये शिरकाव

पुणे : राज्यात ओमायक्रॉन विषाणूची लागण झालेल्या रुग्णांमध्ये वाढ होत असून, सोमवारी दोन रुग्णांची भर पडली आहे. त्यात पुण्यातील 39 वर्षीय महिला आणि लातूर जिल्ह्यातील 33 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. त्यामुळे राज्यातील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या 20 वर पोहोचली आहे. (Shocking: Two more omicron patients in the state)

 

High quality liquor : उच्च प्रतीची दारू नवीन दरानुसार कितीला मिळेल !

राज्यात ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण कल्याण डोबिवली येथे सापडला होता. त्यानंतर पुणे आणि पिंपर – चिंचवड मध्ये रुग्ण सापडल्याने एकच खळबळ उडाली होती. आतापर्यंत 9 रुग्णांची RTPCR चाचणी निगेटिव्ह आली आहे. (Shocking: Two more omicron patients in the state)

 

 

सोमवारी सायंकाळी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिलेल्या अहवालानुसार राज्यात आणखी २ रुग्ण ओमायक्रॉन बाधित आढळले आहेत. यापैकी एक रुग्ण पुणे येथील आणि एक रुग्ण लातूर येथील आहे. आजपर्यंत राज्यात एकूण २० ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. त्यात मुंबई ५, पिंपरी चिंचवड १०, पुणे मनपा-२ कल्याण डोंबिवली- १ नागपूर १ आणि लातूर जिल्हातील एका रुग्णाचा समावेश आहे. विशेष म्हणजे दोन्ही रुग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत. सध्या दोघेही विलगीकरणात असून, काही दिवसांपूर्वी दुबई येथून परतल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. या दोन्ही रुग्णांचे प्रत्येकी ३ निकटसहवासित कोविड निगेटिव्ह आले आहे. (Shocking: Two more omicron patients in the state)

Local ad 1