...

धक्कादायक : महिलांमधील कर्करोगात भविष्‍यात वाढ होण्याची भिती !

आयसीएमआर च्या अहवालातून आली माहिती

पुणे : जीवनशैलीतील बदल, चुकीची जीवनशैली, पर्यावरणीय घटकांमुळे महिलांमध्ये स्तन, फुफ्फुस, गर्भाशय मुख, यकृत कर्करोगाचे (Breast, lung, cervical, liver cancer) प्रमाण वाढत असल्‍याचे समोर आले आहे. गेल्या दशकात पुरुषांपेक्षा महिलांमध्ये कर्करोगाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. हे वाढते प्रमाण चिंताजनक असले तरी वेळीच निदान, उपचार आणि प्रतिबंधात्मक उपायांमुळे जगण्याची शक्‍यता आणि जीवनमान सुधारू शकते असे तज्‍ज्ञांचे मत आहे. (Shocking Fears of increase in cancer among women)

 

 

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) ने याबाबतचा केलेला अहवाल प्रतिष्ठित वैद्यकीय नियतकालिक ‘द लॅन्सेट’मध्ये (The Lancet) प्रकाशित झाला आहे. त्‍यानुसार गेल्या दशकात पुरुषांपेक्षा महिलांमध्ये कर्करोगाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे आणि भविष्यात हा दर वाढतच राहील असे भाष्‍य केले आहे. यामध्‍ये महिलांना स्तनाच्या कर्करोगाचा सर्वाधिक असला तरी, इतर कर्करोगाचेही प्रमाण वाढत आहे. यानुसार २०२२ ते २०५० दरम्यान मृत्युदर ६४.७ वरून १०९.६ पर्यंत वाढण्याचा अंदाजही तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. (Shocking Fears of increase in cancer among women)

 

 

 

गेल्या काही वर्षांत ३५ ते ६५ वयोगटातील महिलांमध्ये कर्करोगाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत असून स्तन, थायरॉईड, फुफ्फुस आणि गर्भाशय मुखाचा कर्करोग अधिक सामान्‍य होत आहे. तळेगाव येथील ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरच्या (२०२३-२०२५) आकडेवारीनुसार, २० ते ३० वयोगटातील महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे एकही रुग्ण आढळलेला नाही. तर, ३० ते ४० वयोगटात १५.९% महिलांमध्ये, ४०-५० वयोगटातील २७.०% , ५० ते ६० वयोगटातील महिलांमध्ये २८.६% तर ६० ते ७० वयोगटातील १४.३% महिलांना स्तनाच्या कर्करोगाचे निदान झाल्याची माहिती रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट डॉ. गौरव जसवाल यांनी दिली.

 

कर्करोगतज्ज्ञ म्हणतात, जगण्याचा दर आणि जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी वेळीच निदान करणे गरजेचे आहे. वेळीच निदान आणि उपचार केल्यास जगण्याच्या दरात लक्षणीयरित्या वाढ होते. सामान्य फुफ्फुसाच्या कर्करोगाचा जगण्याचा दर पाच वर्ष म्हणजेच ६१ टक्के इतका आहे. मात्र तो जेव्हा इतर अवयवांमध्ये पसरतो तेव्हा त्या व्यक्तीचा जगण्याचा दर ७ टक्के इतका कमी होतो. कर्करोगाच्या उपचारात (शस्त्रक्रिया, रेडिओथेरपी किंवा सिस्टेमिक थेरपी) विलंब झाल्यास मृत्यूदरात वाढ होते.

 

येरवडा मनोरुग्णालयातील अधिकाऱ्यांनी अंडरवेअर खरेदीतही केला भ्रष्टाचार

काय आहेत उपाय

कर्करोग रोखण्यासाठी महिलांनी संतुलित आहाराचे सेवन करावे, दररोज व्यायाम करावा, वजन नियंत्रित राखावे अल्कोहोलचे सेवन मर्यादित करावे, तंबाखू आणि इतर कर्करोगजन्य घटक टाळावेत. नियमित तपासणीमुळे कर्करोगाचे वेळीच निदान करता येते व त्याच्या त्यांच्यावर उपचार करता येतात. स्तन, गर्भाशयाच्या मुखाचा आणि गुदद्वाराच्या कर्करोगांसाठी तपासणी तसेच रक्तदाब, कोलेस्ट्रॅाल आणि मधुमेहाची तपासणी करा. एचपीव्ही लसीकरण हे गर्भाशयाच्या कर्करोगापासून बचाव करण्‍यासाठी उपयुक्‍त

 

Local ad 1