...

पुण्यात उदय सामंतांच्या गाडीवर शिवसेनेचा हल्ला

 Uday Samant :  माजी उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत (Former Higher Education Minister Uday Samant) यांच्या गाडीवर कात्रज भगत हल्ला करण्यात आला आहे. याप्रकणात पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले आहे. (Shiv Sena workers attacked Uday Samanta’s car in Pune)

 

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  पुणे दौऱ्यावर आहेत. हडपसर भागातील कार्यक्रम आटोपून मुख्यमंत्री शिंदे यांचा ताफा कात्रज भागात आमदार तानाजी सावंत यांच्या घराकडे कात्रज चौकातुन पुढे गेला, मागे असलेल्या उदय सामंत यांची गाडी सिग्नलवर थांबलेली असताना हल्ला करण्यात आला आहे. (Shiv Sena workers attacked Uday Samanta’s car in Pune)

 

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि  शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे दोघे एकाच दिवशी  पुणे दौऱ्यावर आहेत. एका शहरात, एकाच दिवशी ठाकरे शिवसेना आणि शिंदे शिवसेना आमने-सामने येणार अशी शक्यता व्यक्त करण्यात आली होती. (Shiv Sena workers attacked Uday Samanta’s car in Pune)

 

 

दरम्यान, आदित्य ठाकरे यांची सभा कात्रज चौकात हाती. त्यापासून जवळच असलेल्या माजी मंत्री तानाजी सावंत यांचे घर असून, त्याठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नियोजित दौरा होता. विषेश म्हणजे दोघांचीही वेळ एकच होती. त्यामुळे ठाकरे शिवसेना आणि शिंदे शिवसेना आमने-सामने आल्यास संघर्ष होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती.

 

 

दरम्यान, उदय सामंत यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यावेळी सामंत यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, माझ्यावर झालेला नियोजित होता, असा आरोप केला आहे. (Shiv Sena workers attacked Uday Samanta’s car in Pune)

Local ad 1