...

खासदार संजय राऊत यांनी आदित्य ठाकरे यांना मारली मिठी !

उद्धव ठाकरे यांनी केले भाष्य ;

Shivsena News : शिवसेनेचे खासदार संजय राऊत मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत तुरुंगवास आणि झालेली अटक यावर भाष्य केले . यावेळी माजी मंत्री आदित्य ठाकरे आणि आमदार सुनील राऊत उपस्थित होते. (MP Sanjay Raut met Aditya Thackeray) 

 

 

पत्रकार परिषदेत संजय राऊतांच्या जामीनावर पहिली प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘ आनंदाखेरीज दुसरी प्रतिक्रिया असू शकत नाही. संजयच्या धाडसाचं कौतुक आहे. मुद्दाम आरेतुरे बोलतो. संजय शिवसेनेचा नेता, खासदार, सामनाचा कार्यकारी संपादक आहे. त्याचबरोबरीनं जिवलग मित्र आहे. संकटाच्या काळात न डगमगता लढत असतो. संकटात तो लढतोय. कालन्यायालयाने निकाल दिला. न्यायदेवतेचे मी आभार मानतो. (MP Sanjay Raut met Aditya Thackeray)

 

 

 

उद्धव ठाकरे स्पष्ट बोलले

उद्धव ठाकरे यांनी यावेळी कोर्टाचे आभार मानले. ते म्हणाले, ‘ काल स्पष्ट झालं. न्यायदेवतेचे आभार,. काही स्पष्ट निरीक्षणं नोंदवली आहे. केंद्रीय यंत्रणा पाळीव प्राण्यांप्रमाणे वागत आहे. ज्याच्या अंगावर जा म्हटलं तर जात आहे. हे संपूर्ण जग बघत आहे. देश बघत आहे. गेल्या काही दिवसातील उदाहरणे आहेत. (MP Sanjay Raut met Aditya Thackeray)

 

 

 

Local ad 1