नांदेड : रयतेच्या हिताचा कारभार कसा असावा याचा आदर्श वस्तुपाठ निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांनी 6 जून 1674 रोजी शिवस्वराज्याचा अभिषेक केला. याच्या प्रित्यर्थ 6 जून हा दिवस महाराष्ट्रातील ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये “शिवस्वराज्य दिन” म्हणून शासनातर्फे साजरा केला जात आहे. (Shivrajya din)
नांदेड जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती, पंचायत समिती पुढे सरसावल्या आहेत. जिल्हा परिषदेत सर्व पदाधिकारी व विभाग प्रमुख यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषदेच्या प्रांगणात मुख्य समारंभ होईल. सकाळी 9 वा. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर यांच्या हस्ते भगव्या स्वराज्य ध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारुन अभिवादन केले जाईल. पालकमंत्री अशोक चव्हाण हे या कार्यक्रमाच्या औचित्याने उपस्थितांशी ऑनलाईन संवाद साधणार आहेत. (Shivrajya din)