शिवसेनेचे अनोखे आंदोलन, रस्त्यावरील खड्ड्याची केली पूजा

पुणे : पुणे तिथे काय उणे ! ही म्हण प्रचिलित आहे. त्यात शिवसेना आपल्या अनोख्या आंदोलनासाठी ओळखली जाते. प्रभाग क्रमांक 27 (Ward No. 27) मध्ये चेंबरचे (Chamber) झाकण रस्त्यावर आल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्याविरोधात स्थानिक शिवसेना शाखेच्या वतीने रस्त्यातील खड्ड्याची पूजा करुन आंदोलन महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधले. (Shiv Sena’s unique agitation, worship of potholes on the road)

 

वीज पडून होणारी जीवितहानी टाळण्यासाठी ‘दामिनी’ अॅप वापरा

प्रभाग क्रमांक २७ मध्ये अवघ्या ४ महिन्यात तयार केलेल्या काँक्रिटीकरण रस्त्यावर पावसाळी गटार लाईनीच्या चेंबरमुळे अनेक अपघात होत आहेत. वारंवार तक्रार देऊन सुध्दा कोणत्याही प्रकारची दुरुस्ती अधिकारी करत नाहीत. त्यामुळे महापालिकेच्या विरोधात शिवसेनेच्या वतीने जावेद खान यांच्या नेतृत्वाखाली खड्डयाची पुजा करुन अनोखे आंदोलन करण्यात आले. येत्या ७ दिवसात प्रभागातील खड्डे बुजविण्यात न आल्यास शिवसेना स्टाईलने पुढील आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला . (Shiv Sena’s unique agitation, worship of potholes on the road)

 

शालेय शिक्षणासाठी लागणारे दाखले काढून घेण्याचे आवाहन

आंदोलनात अनिल दामजी, पद्माताई सोयरे,रमेश परदेशी,भारती दामजी, बाबा परदेशी, मुरली विलकर,गजानन देशमुख, सचिन घोलप आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते. (Shiv Sena’s unique agitation, worship of potholes on the road)

Local ad 1