शेतकरी ग्रामविकास आघाडी देणार प्रस्थापितांना दे धक्का

जवळा सोसायटीची निवडणूक राज्यात चर्चेत

पुणे, दि 14 एप्रिल, वृत्तसंस्था : अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुका राज्यात एका निवडणुकीने सध्या चर्चेत आला आहे. या निवडणुकीत जुन्या जाणत्या सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्रित येत राष्ट्रवादी समोर मोठे अव्हान उभे केले आहे. ही निवडणुक जवळा विविध कार्यकारी सेवा संस्थेची आहे .या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी ग्रामविकास आघाडी प्रस्थापितांना दे धक्का देण्याच्या तयारीत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

जामखेड तालुक्यातील जवळा विविध कार्यकारी सेवा संस्थेची पंचवार्षिक निवडणूक होत आहे. या निवडणुकीत सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्रित येत शेतकरी विकास आघाडी स्थापन केली आहे.या आघाडीत भाजप व राष्ट्रवादीतचे नेते एकत्र आले आहे. या आघाडीविरोधात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी ग्रामविकास आघाडी स्थापन केली आहे. ही निवडणुक पक्षीय नसल्याचे दोन्ही गटाकडून सांगितले जात असले तरी या निवडणुकीत भाजप विरूध्द राष्ट्रवादी असा छुपा सामना रंगला आहे.

जवळा सोसायटी निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. दोन्ही गटांकडून प्रचार सभांचा धडाका सुरू आहे. यात दोन्ही गटाकडून आरोप प्रत्यारोपांच्या तोफा धडाधडत आहेत.शेतकरी विकास आघाडीचे नेते व्यक्तीद्वेषाचे आरोप करण्यात व्यस्त आहे. तर शेतकरी ग्रामविकास आघाडीचे नेते वर्षानुवर्षे सत्ता भोगणाऱ्यांना दुर सारा आणि आम्हाला एकदा संधी द्या असे अवाहन करत आहेत.

शेतकरी विकास आघाडीत मातब्बर नेत्यांचा भरणा आहे.त्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. या नेत्यांच्या मनमानी आणि दपडशाहीच्या राजकारणाला जनता वैतागलेली आहे. यावर्षीच्या निवडणुकीत पुन्हा सत्ता कायम राखण्यासाठी शेतकरी विकास आघाडीला खूप मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे, या आघाडीचे चेअरमनपदाचे उमेदवार शहाजी पाटील यांच्याविरोधात मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. या नाराजीचा मोठा फटका शेतकरी विकास आघाडीला बसत असल्याचे चित्र आहे.

शहाजी पाटील यांच्या विरोधात असलेले मतदार आता शेतकरी ग्रामविकास आघाडीला पाठबळ देताना दिसत आहेत. जवळा सेवा सोसायटीच्या निवडणुकीत मोठा राजकीय चमत्कार करण्याचा इरादा जनतेने बनवला आहे. शेतकरी ग्रामविकास आघाडीच्या रॅलीत दिसलेली गर्दी याचेच संकेत देणारी ठरत आहे.

आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी ग्रामविकास आघाडी प्रस्थापितांना दे धक्का देण्याच्या तयारीत आहे. काही महिन्यांपुर्वी राज्यातील नगरपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या होत्या, यात कवठेमहंकाळची निवडणुक राज्यात गाजली होती, या निवडणुकीत सर्वपक्षीय नेत्यांनी दिलेल्या उमेदवाराला जनतेने पराभवाची धुळ चारत युवा नेत्याच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला होता. अशीच पुनरावृत्ती अहमदनगर जिल्ह्यातील जामखेडच्या जवळा विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या निवडणुकीत होताना दिसत आहे.

Local ad 1