Sharad Pawar Threat Case । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तखा खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांना सोशल मीडियावरून (Social Media) धमकी देणाऱ्या एका आयटी इंजिनीअर असेल्या आरोपीला मुंबई गुन्हे शाखेच्या (Mumbai Crime Branch) पथकाने रविवारी पुण्यातून अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर बर्वे (वय 34) असं पवारांना धमकी देणाऱ्या आरोपीचे नाव आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना धमकी दिल्याप्रकरणी लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात मुंबई गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास करत विविध पथके तयार करण्यात आली होती.