शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधीत वाढ, किती झाली वाढ जाणूनव घ्या
मुंबई : शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधीत सध्या 35 कोटी रुपये राष्ट्रीयकृत बँकेत मुदतठेव स्वरूपात गुंतवण्यात आले असून, त्यावरील मिळणाऱ्या व्याजामधून राज्यातील पत्रकारांना दुर्धर आजार, अपघात झाल्यास किंवा त्यांच्या मृत्यूपश्चात वारसांना मदत करण्यात येत आहे, अशी माहिती व जनसंपर्क विभागाच्या राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी दिली. (Increase in Shankarrao Chavan Golden Jubilee Journalist Welfare Fund)
याविषयी विधानसभेचे सदस्य रोहित पवार यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना कुमारी तटकरे बोलत होत्या. (Increase in Shankarrao Chavan Golden Jubilee Journalist Welfare Fund)
या योजनेंतर्गत अधिस्वीकृतीधारक पत्रकार व त्याची पत्नी/पती तसेच त्यांच्यावर अवलंबून असलेली मुले यांना वैद्यकीय उपचारार्थ आर्थिक मदत देण्यात येत आहे. या योजनेंतर्गत आजवर 258 पत्रकार व त्यांचे कुटुंबिय यांना एकूण रु.१ कोटी ५८ लाख ५२ हजार ७११ एवढी रक्कम वैद्यकीय कारणास्तव आर्थिक मदत करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. (Increase in Shankarrao Chavan Golden Jubilee Journalist Welfare Fund)
पत्रकारांना सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत आरोग्याची सुविधा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेमध्ये केशरी व पिवळे शिधापत्रिकाधारक किंवा तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला असलेल्या पत्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेमुळे राज्यातील पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांना याचा फायदा झाला आहे. याच दृष्टीकोनातून महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये पत्रकारांचा समावेश करण्यात आलेला आहे. (Increase in Shankarrao Chavan Golden Jubilee Journalist Welfare Fund)
शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधीत पूर्वी 10 कोटी रुपयांची तरतूद होती. गेल्या दोन वर्षात त्यामध्ये आणखी 25 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहितीही कुमारी तटकरे यांनी दिली. (Increase in Shankarrao Chavan Golden Jubilee Journalist Welfare Fund)