SET Exam Date 25 Maharashtra । राज्य पात्रता परीक्षेची (सेट) तारीख जाहीर

SET Exam Date 25 Maharashtra In Marathi । पुणे : विद्यापीठे आणि महाविद्यालयातील सहायक प्राध्यापक पदाच्या पात्रतेसाठी घेतली जाणारी राज्य पात्रता परीक्षा (सेट) ४ मे रोजी आयोजित करण्यात येणार आहे. ही परीक्षा पारंपरिक (ऑफलाइन) पद्धतीनेच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. विद्यापीठाच्या प्रभारी कुलसचिव डॉ. ज्योती भाकरे यांनी या बाबतची माहिती परिपत्रकाद्वारे दिली. (SET Exam Date 25 Maharashtra In Marathi)

 

 

 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठातर्फे सेट परीक्षा आयोजित करण्यात येते. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या राष्ट्रीय पात्रता परीक्षेच्या (युजीसी नेट) धर्तीवर सेट परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती या पूर्वी विद्यापीठाकडून देण्यात आली होती. (SET Exam Date 25 Maharashtra In Marathi)

 

पुण्यात मोफत प्लास्टिक सर्जरी शिबीराचे आयोजन

 

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सूचनेप्रमाणे आतापर्यंत घेण्यात आलेल्या ३९ सेट परीक्षांप्रमाणेच ४०वी सेट परीक्षाही पारंपरिक ओएमआर पद्धतीचेच घेतली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सेट परीक्षेसंदर्भातील सविस्तर वेळापत्रक अभ्यासक्रम आणि इतर अनुषंगिक माहिती वेळोवेळी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे, असेही परिपत्रकात नमूद करण्यात आली आहे. परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आल्यामुळे परीक्षार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन करता येणार आहे. (SET Exam Date 25 Maharashtra In Marathi)

 

Local ad 1