कंधार : महाराष्ट्रची मुलुख मैदानी तोफ, ज्येष्ठ स्वतंत्र सेनानी माजी खासदार व माजी आमदार भाई डॉ. केशवराव धोंडगे यांची प्राणज्योत आज 1.20 मिनिटांनी मालवली. मृत्यू समय ते 102 वर्षांचे होते. धोंडगे यांचे निधन झाल्याची माहिती एडवोकेट मुक्तेश्वर धोंडगे यांनी सोशल मीडिया वरून दिली आहे. (Senior leader Dr. Keshavrao Dhondge passed away at the age of 102)
केशवराव धोंडगे हे पाच वेळा आमदार आणि एक वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. मराठवाड्याची मुलुख मैदानी तोफ म्हणून त्यांची ओळख होती.नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यात असलेल्या एका छोट्याशा गावातून केशवराव धोंडगे यांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात केली. त्यांनी शेतकरी कामगार पक्षासोबत स्वत:ला जोडून घेतले. त्यांची साम्यवाद, मार्क्सवाद अशा दोन्ही विषयांवर अढळ निष्ठा होती. त्यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न अत्यंत पोटतीडकिने विधिमंडळ आणि संसदेत मांडले. (Senior leader Dr. Keshavrao Dhondge passed away at the age of 102)hondge passed away at the age of 102)