Sameer Wankhede । आर्यनसह अन्य प्रकरणाचा तपास ; त्यावर समीर वानखेडे काय म्हणाले पहा..!

मुंबई : अभिनेता शाहरुखचा मुलगा आर्यन खानसह सहा ड्रग्ज प्रकरणाच्या तपासातून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे  (Sameer Wankhede, Zonal Director, Bureau of Narcotics Control) यांना बाजूला सारण्यात आले आहे. यावर आता वानखेडे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. (See what Sameer Wankhede said on that..!)

 

 

चर्चेतील ड्रग्ज प्रकरणाचा तपास एनसीबीची नवी टीम करणार आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (NCP leader Nawab Malik) यांचे जावई समीर खान यांच्या केसचा देखील समावेश आहे. समीर वानखेडे यांच्यावर वसुलीचे आरोप झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

 

 

मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणातून समीर वानखेडेची हकालपट्टी केल्यानंतर दिल्ली एनसीबीचे एक पथक आज शनिवारी मुंबईत येत आहे. हे पथक मुंबई झोनमधील आर्यन खान प्रकरणासह इतर ५ अशा ६ प्रकरणांची चौकशी करणार आहे. (See what Sameer Wankhede said on that..!)

 

 

 

 एनसीबीचे उपमहासंचालक मुथा अशोक जैन म्हणाले, आमच्या झोनच्या एकूण ६ प्रकरणांची चौकशी आता दिल्लीच्या एनसीबी पथकांकडून केली जाईल, ज्यामध्ये आर्यन खानचे प्रकरण आणि इतर ५ प्रकरणांचा समावेश आहे. हा प्रशासकीय निर्णय असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, वानखेडे यांच्यावर झालेल्या आरोपामुळेच त्यांची तापसपासून हकालपट्टी करण्यात आली आहे, अशी चर्चा सुरू आहे.

 

समीर वानखेडेना धक्का : आर्यन खानसह सहा प्रकरणाचा तपास काढून घेतला

 

या सगळया घडामोडीवर समीर वानखेडे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले,  “मला तपासातून वगळण्यात आलेले नाही. या प्रकरणाचा तपास कोणत्या तरी केंद्रीय एजन्सीमार्फत व्हावा, अशी माझी न्यायालयात याचिका देखील केली होती. त्यामुळे आर्यन प्रकरण आणि समीर खान प्रकरणाचा तपास दिल्ली एनसीबीची एसआयटी करत आहे. दिल्ली आणि मुंबईच्या एनसीबी संघांमध्ये हा एक समन्वयचा भाग असल्याचा दावा केला आहे. (See what Sameer Wankhede said on that..!)

 

 

 

 

Local ad 1