पुणे जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर कलम 144 लागू (Section 144 applies to tourist places in Pune district)

पुणे : कोरोनाचे नियम न पाळल्याने जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळावर जमावबंदी आदेश जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी जारी केला आहे. त्यामुळे आता पाच पेक्षा अधिक पर्यटकांना एकत्र जाता येणार नाही. तसेच धबधब्यांच्या एक किलोमीटर अतंरापर्यंत वाहनांना प्रवेश बंदी घालण्यात आली आहे.Section 144 applies to tourist places in Pune district

उपमुख्यमंत्री अजित पवार प्रत्येक शुक्रवारी जिल्ह्यातील कोरोच्यास्थितीचा आढावा घेत असतात. शुक्रवारी त्यांनी आढावा घेतला. त्यात जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर होणाऱ्या गर्दीविषयी चिंता व्यक्त करत निर्बंध कडक करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी कलम 144 लागू करण्याचे आदेश जारी केले आहेत. कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा धोका असतानाच अशा गर्दीमुळे रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात लोणावळ्यासह अन्य पर्यटनस्थाळांवर हजारो पर्यटकांची गर्दी होत आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी आदेश जारी केल्याचे आदेशात नमुद करण्यात आले आहे. ( Section 144 applies to tourist places in Pune district)

जमावबंदी अंतर्गत 5 किंवा 5 पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येता येणार नाही. वेगाने वाहणार्‍या पाण्यात उतरणे, पोहणे यावर बंदी घालण्यात आली. धबधब्याखाली जाणे, प्रवाहात जाण्यावर बंदी, धबधबे, दर्‍यांचे कठडे, धोकादायक वळणे यावर सेल्फीसाठी बंदी धबधबा परिसरात मद्यपानास बंदी, धोकादायक ठिकाणी वाहने थांबवण्यास बंदी, धबाधबा परिसरात 1 कमी जाण्यास मनाई करण्यात आली आहे.त्यामुळे पावसाळी पर्यटनाचा  बेत अखणाऱ्यांना हिरमोड झाला आहे.  Section 144 applies to tourist places in Pune district

Local ad 1