काय म्हणता..! शंभर रुपयाची लाच घेणारा सेवा सहकारी संस्थेचा सचिव एसीबीच्या जाळ्यात

NANDED ACB TRAP : सेवा सहकारी संस्थेचे कोणतेही कर्ज नाही (बेबाकी) असे प्रमामणपत्र देण्यासाठी नंदनवन ता. कंधार येथील सेवा सहकारी संस्थेच्या सचिवाने तक्रार यांच्याकडे दोन हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीनंतर 500 रुपयांवर डिल फायनल झाली. परंतु प्रत्यक्षात 100 रुपयांची लाच घेताना नंदनवन ता. कंधार येथील सेवा सहकारी संस्थेच्या सचिव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाच्या (Anti Corruption Bureau) जाळ्यात अडकला आहे. (Secretary of Seva Society who took Rs 100 bribe in ACB’s net) ही कारवाई कंधार तालुक्यातील चिखली येथे करण्यात आली.

 

नागराज वसंतराव जोशी (Nagaraj Vasantrao Joshi) (वय 50 वर्षे, पद – सचिव, सेवा सहकारी संस्था मर्यादित नंदनवन ता.कंधार, जि.नांदेड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

 

Nanded ACB Trap । गुंठेवारीची फाईल मंजूरीसाठी लाच घेणार महापालिकेचा लिपिक अटक

 

 

 

 

तक्रारदार यांनी नंदनवन (ता. कंधार) येथील शेतजमिनीवर पीक कर्जासाठी ICICI बँक नांदेड (ICICI Bank Nanded) येथे अर्ज केला आहे. ICICI बँकेने त्यांना विविध बँका व सोसायटीचे बे-बाकी प्रमाण पत्र सादर करण्यास सांगितले. त्यानुसार तक्रारदार यांनी 9 जून रोजी बेबाकी प्रमाणपत्राची मागणी नंदनवन ता. कंधार येथील सेवा सहकारी संस्थेचा सचिव जोशी याच्याकडे केली. त्यावेळी जोशी याने तक्रारदाराकडे दोन हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर 12 जून रोजी तक्रारदारांनी जोशी याला बे-बाकी प्रमाणपत्राबाबत फोन वरुन विचारले असता, 500 रुपये द्या, असे सांगितले.

 

 

तक्रारदार यांना लाच द्यायची इच्छा नव्हती. त्यामुळे त्यांनी सचिव जोशी विरोधात 12 जून रोजी अँटी करप्शन ब्युरो नांदेड युनिट, येथे लेखी तक्रार दिली. या तक्रारीची दोन पंचा समक्ष 12 जून रोजी पडताळणी करण्यात आली. त्यावेळी तक्रारदार यांना 100 रुपयाची मागणी करून सातबारा अनायला साांगितले. तक्रारदार सातबारा घेऊन गेले असता जोशी हे नंदनवन गावातून निघून गेले होते. 13 जून रोजी लाच देण्यास तक्रारदार गेले, असता त्यांनी 100 रुपयो रुपये स्वीकारले. यावेळी तक्रारदार यांनी पैसे दिल्याची पावती मागितली. त्यावर जोशी याने तशी कोणतीही पावती नसते, तुम्हाला पावती देणार नाही, असे सांगितले. त्यामुळे शंभर रुपये लाच म्हणून स्विकारले, असे एसीबीच्या वतीने सांगण्यात आले.

 

 

आरोपीला अटक करण्यात आली असून, पोलीस स्टेशन उस्मानगर ता.कंधार (Police Station Usmanagar District Kandahar) जि. नांदेड येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई डॉ.राजकुमार शिंदे (पोलीस अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो,नांदेड परिक्षेत्र,नांदेड) (Superintendent of Police, Anti-Corruption Bureau, Nanded Zone, Dr. Rajkumar Shinde) राजेंद्र पाटील (पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो, नांदेड) यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली. एसीबीचे पोलीस निरीक्षक गजानन बोडके (ACB Police Inspector Gajanan Bodke) यांच्या पथकाने ही कारवाई केली होती. त्यात पोहेकॉ किसन चिंतोरे, पोना जेश राठोड, पोकॉ अरशद खान, चापोह मारोती सोनटक्के आदींचा सहभाग होता. (Secretary of Seva Society who took Rs 100 bribe in ACB’s net)

Local ad 1