...

नांदेड जिल्ह्यातील शाळा सुरू होणार ; कधीपासून जाणून घ्या…

नांदेड : सातत्याने शाळा सुरू करण्याची मागणी होत असल्याने दिनांक 24 जानेवारी 2022 पासून जिल्ह्यातील शाळा सुरू (School started) करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर (Collector Dr. Vipin Itankar) यांनी दिली आहे. (Schools in Nanded district will start from January 24)

 

स्थानिक परिस्थितीचा विचार करुन महानगरपालिका क्षेत्रात महापालिका आयुक्त, राज्यातील इतर भागात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना शाळा सुरू करण्याचा अधिकार दिले आहेत. (Schools in Nanded district will start from January 24)

नांदेड जिल्ह्यातील कोवीड-19 ची परिस्थिती पाहता 15 ते 18 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण 24 जानेवारी पासून जिल्ह्यातील सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या इयत्ता नववी ते बारावीच्या शाळा सुरू करण्यात मान्यता दिली आहे. शासनाने वेळोवेळी कोविड- 19 च्या संदर्भात दिलेल्या सर्व सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे. तसेच 15 ते 18 वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांचे लसीकरण शंभर टक्के पूर्ण करावे, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रमुख डॉ. विपीन इटनकर यांनी निर्गमीत केले आहेत. (Schools in Nanded district will start from January 24)

Local ad 1