नांदेड जिल्ह्यातील शाळा कधी पासून बंद असणार

नांदेड : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन राज्य शासानाने काही निर्बंध लागू केले  आहेत. दरम्यान,  नांदेड जिल्ह्यातील पहिली ते आठवीपर्यंतची शाळा 10 ते 30 जानेवारी दरम्यान, बंद  ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून, ऑनालईन वर्ग सुरु असणार आहेत, अशी माहिती जिल्हा जिल्हाधिकारी डाॅ. विपिन इटनकर  यांनी परिपत्राकाद्वारे दिली आहे. (Schools in Nanded district will be closed, you know?)

 

 

चिंता वाढणारी बातमी । राज्यात बुधवारी आढळले 26 हजार कोरोना बिधत

राज्यासह नांदेड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून निर्बंध लावले जात आहेत.  नांदेड जिल्ह्यातील पहिली ते आठवी पर्यंतच्या शाळा 10 ते 30 जानेवारी दरम्यान बंद रहातील. मात्र, ऑनलाईन शिकवणी सुरू राहणार आहेत, असे आदेश जिल्हाधिकारी डाॕ. विपिन यांनी जारी केले आहेत. (Schools in Nanded district will be closed, you know?)

 

नांदेड जिल्ह्यात 45 कोरोना बाधित आढाळले

Schools in Nanded district will be closed, you know
Schools in Nanded district will be closed, you know

राज्यातील महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार

  दरम्यान, राज्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालये आणि परीक्षांच्या बाबतीत मोठा निर्णय राज्य सरकार घेणार असल्याची चर्चा गेल्या दोन दिवसांपासून सुरू होती. आज राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यासंदर्भात घोषणा केली असून, राज्यातील सर्व अकृषी महाविद्यालये आणि तंत्रशिक्षण संस्था १५ फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार असल्याचं त्यांनी जाहीर केले आहे. तसेच, सर्व विद्यापीठांनी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्याचा निर्णय देखील घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. (Schools in Nanded district will be closed, you know?)

 

 

परीक्षा ऑनलाईन होणार !

मंगळवारी यासंदर्भात सविस्त बैठक झाल्यानंतर आज उदय सामंत यांनी यासंदर्भातला निर्णय जाहीर केला आहे. “सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, तंत्रनिकेतन, विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांमधली परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  विजेची अनुपलब्धता, नेटवर्क कनेक्टिव्हिटीमुळे, विद्यार्थ्यांच्या कुटुंबात किंवा विद्यार्थी करोनाबाधित असतील तर त्यांचं शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, याची दक्षता सर्व विद्यापीठांनी घेतली पाहिजे. खासगी विद्यापीठांनी देखील याच निर्णयाचं पालन करायला हवं”, असं ते म्हणाले. (Schools in Nanded district will be closed, you know?)

Local ad 1